Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Malegaon Blast: मोठी बातमी! ध्वजारोहण सुरू असतानाच मालेगावमध्ये शक्तिशाली स्फोट; 5 जण गंभीर जखमी

Malegaon Blast: मोठी बातमी! ध्वजारोहण सुरू असतानाच मालेगावमध्ये शक्तिशाली स्फोट; 5 जण गंभीर जखमी

Malegaon Blast: देशभरात २६ जानेवारीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच, मालेगावमध्ये एका भीषण दुर्घटनेने या आनंदावर विरजण घातले आहे. पोलीस परेड ग्राउंडच्या अगदी जवळ असलेल्या फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन सिलेंडरचा सकाळी ९:१५ च्या सुमारास जोरदार स्फोट झाला. या भीषण अपघातात दोन लहान मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

फुगे विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फोट

सोमवारी सकाळी पोलीस परेड ग्राउंडवर अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात होती. शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या उपस्थितीने मैदान भरलेले असतानाच, मैदानातून काही अंतरावर असलेल्या फुगे विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला. हा आवाज इतका मोठा होता की क्षणभर परिसरात नेमके काय झाले, हे कोणालाच समजले नाही.

पाच जण जखमी

प्रजासत्ताक दिनानिमित्त फुगे घेण्यासाठी विक्रेत्याभोवती गर्दी झाली होती, नेमक्या त्याच वेळी काळाने घाला घातला. या दुर्घटनेत विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन हे पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, मात्र यातील दोघांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याने त्यांना तातडीने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सिलेंडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फुग्यांमध्ये गॅस भरत असताना सिलेंडरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि दाब वाढल्याने स्फोट झाला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा ताबा घेतला असून, सुरक्षेच्या कारणास्तव परिसराची नाकेबंदी केली आहे. भरवस्तीत आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी अशा प्रकारे सिलेंडरचा वापर करण्याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!