Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik News: खेळता खेळता काळाचा घाला! नाशिकमध्ये 6 वर्षीय कीयांशचा चौथ्या मजल्यावरून कोसळून करुण अंत

Nashik News: खेळता खेळता काळाचा घाला! नाशिकमध्ये 6 वर्षीय कीयांशचा चौथ्या मजल्यावरून कोसळून करुण अंत

Nashik News: नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील नरहरी नगरमध्ये एक अत्यंत चटका लावणारी घटना घडली आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीत खेळत असताना अचानक तोल गेल्याने सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कीयांश प्रफुल्ल बेदाडे असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास कीयांश हा आपल्या राहत्या घरातील गॅलरीत खेळण्यात मग्न होता. खेळता खेळता अचानक त्याचा नियंत्रण सुटले आणि तो थेट चौथ्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की, जमिनीवर आदळल्याने कीयांशला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा – Loni Kalbhor Accident: खेळता-खेळता होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात सोसायटीच्या पार्किंगमध्ये चिमुकल्याचा करुण अंत

एका क्षणात होत्याचे नव्हते झाले
कीयांश हा बेदाडे कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील कामानिमित्त मनमाड येथे असतात, तर तो नाशिकमध्ये आई आणि दोन बहिणींसोबत राहत होता. घराचा लाडका आणि एकुलता एक मुलगा डोळ्यादेखत गेल्याने आईने केलेला आक्रोश काळजाचा थरकाप उडवणारा होता. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्या डोळ्यांतही या घटनेने पाणी आले.

पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस ठाण्यात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. इमारतीच्या गॅलरीला सुरक्षा कठडे (Grills) होते का किंवा हा अपघात नेमका कसा घडला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!