Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ganesh Naik: ‘भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण…’; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा

Ganesh Naik: ‘भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण…’; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा

Ganesh Naik on Eknath Shinde: महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण शांत होईल अशी चिन्हे होती, मात्र नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता अधिकच तीव्र होताना दिसत आहे. ‘पक्षाने (भाजपने) मोकळीक दिली, तर समोरच्यांचे राजकीय नामोनिशाण मिटवून टाकू,’ अशा कडक शब्दांत भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे. यामुळे येणाऱ्या काळात महायुतीमधील अंतर्गत कलह अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पक्षशिस्तीमुळेच आतापर्यंत संयम; नाईकांनी व्यक्त केला संताप

गणेश नाईक यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवत स्पष्ट केले की, केवळ भाजपच्या शिस्तीमुळे आपण आतापर्यंत संयम पाळला आहे. कार्यकर्त्यांच्या मनात मोठी खदखद असतानाही केवळ नेतृत्वाचा शब्द प्रमाण मानून आपण माघार घेतली, असे त्यांनी नमूद केले. ‘पक्षाच्या आदेशापुढे आम्ही नतमस्तक झालो, मात्र जर वरिष्ठांनी परवानगी दिली असती, तर आजचे राजकीय चित्र पूर्णपणे वेगळे दिसले असते,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

हेही वाचा – नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली तर…; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

काय होता नाईकांचा ‘स्वबळाचा’ फॉर्म्युला?

निवडणुकीपूर्वी महायुतीत जागावाटपाचा पेच निर्माण झाला असताना नाईकांनी एक वेगळा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या मते, मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सर्व घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, त्याला इतरांनी पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करावी. यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला असता, असे नाईकांचे ठाम मत आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती, मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे आणि कल्याणमधील भाजपची ‘कोंडी’

जागावाटपाच्या मुद्द्यावरून नाईकांनी शिवसेनेवर (शिंदे गट) जोरदार निशाणा साधला. नवी मुंबईत शिवसेनेने अवास्तव ५७ जागा मागितल्या होत्या, तर भाजप २०-२२ जागा देण्यास तयार होती. अखेर दोन्ही बाजूंनी स्वतंत्र उमेदवार उभे राहिले, जे नवी मुंबईसाठी हिताचे ठरले, असा टोला त्यांनी लगावला. मात्र, ठाणे आणि कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तिथे भाजपच्या ‘घोड्यांचे लगाम’ खेचले गेल्याने कार्यकर्त्यांना वाव मिळाला नाही, अशी टीका करत आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडणे हे माझे कर्तव्य असल्याचे नाईक यांनी ठामपणे सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!