Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली तर…; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली तर…; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

मुंबई: वनमंत्री गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले असून, एका कार्यक्रमात नाईकांनी अप्रत्यक्षपणे खासदार श्रीकांत शिंदेंना लक्ष्य केले. कार्यक्रमात बोलताना नाईकांनी नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 14 गावांचा मुद्दा उपस्थित केला. ही गावं आम्हाला नकोत. महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत ती गावं बाहेर काढली जातील, असा ठाम दावा त्यांनी केला. तसेच कुणाच्यातरी लहरीपणामुळे या गावांचा समावेश झाला, त्याचा बोजा नवी मुंबईवर आम्ही का उचलावा? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुर्ल्यातील कंपन्यांमुळे पाणी दुषित झाले असून त्याचा फटका नवी मुंबईला बसत असल्याचे नमूद करत नाईकांनी शिंदे गटावर थेट निशाणा साधला. तुम्ही दयावान नसल्याचा टोला त्यांनी नाव न घेता शिंदेंना हाणला. भविष्याचा विचार करणार की नाही? असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा – दसरा मेळाव्यादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; सिंधुदुर्गातील ‘एकनिष्ठ’ नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

नवी मुंबईच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत नाईक म्हणाले, आज शहरातील नाले योग्य पद्धतीने बांधले गेले असल्याने पाणी तुंबत नाही. पण जर अयोग्य लोकांच्या हाती सत्ता गेली तर शहराचा बोजवारा उडेल. नाईकांनी आपल्या भाषणात प्रामाणिकपणाचाही उल्लेख केला. माझा हात आणि मन दोन्ही स्वच्छ आहेत. झोप उडवणारा पैसा मला नको. आयटी, सीबीआय तपासाची भीती नाही. सुखाची झोप मिळणं हाच माझा खरा ठेवा आहे, असेही ते म्हणाले.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!