Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Solapur Accident News : पांडुरंगाचे दर्शन ठरलं अखेरचं! देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, सोलापुरातील घटना

Solapur Accident News : पांडुरंगाचे दर्शन ठरलं अखेरचं! देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात, चौघांचा मृत्यू, सोलापुरातील घटना

Solapur Accident News : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून देवदर्शनासाठी आलेल्या डोंबिवली येथील भाविकांच्या वाहनावर काळाने झडप घातली आहे. सोमवारी रात्री शरदनगर परिसरात कंटेनर आणि क्रुझर वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चार भाविकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील भाविक तुळजापूर आणि अक्कलकोट येथे देवदर्शन करून परतीच्या प्रवासासाठी निघाले होते. सलग सुट्ट्यांचा लाभ घेत देवदर्शन उरकून हे भाविक पंढरपूर रेल्वे स्टेशनकडे जात असताना हा अपघात घडला. रात्रीच्या वेळी अचानक कंटेनरने क्रुझर वाहनाला जोरदार धडक दिल्याने वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमी भाविकांना सोलापूर, मंगळवेढा आणि पंढरपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेला हा प्रवास अखेरचा ठरेल, अशी कल्पनाही भाविकांनी केली नव्हती. या घटनेमुळे डोंबिवलीसह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!