Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या निधनाने सुप्रिया सुळे भावूक; नेमकं काय म्हणाल्या…

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या निधनाने सुप्रिया सुळे भावूक; नेमकं काय म्हणाल्या…

बारामती : अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुखद निधनाने संपूर्ण पवार कुटुंब आणि महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. अजितदादांच्या चुलत बहिण आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी X वर “Devastated” असा एक शब्दाचा स्टेटस ठेवत पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असं म्हटलं आहे. अपघातानंतर दिल्लीतून बारामतीकडे रवाना होताना त्यांनी हा स्टेटस ठेवला, ज्याने सोशल मीडियावरून भावूक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे चुलत भावंडे आहेत. शरद पवार यांच्या कुटुंबातील हे दोघे राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत असले तरी कुटुंबीय नात्याने जवळचे होते. २०२३ मध्ये NCP च्या फुटीनंतर अजित पवार यांनी स्वतंत्र गट बनवला आणि सुप्रिया यांच्या विरोधात बारामतीतून पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. तरीही कुटुंबीय संबंध कायम राहिले. आजच्या या अपघाताने सुप्रियाताईंना मोठा धक्का बसला असून, ते दिल्लीतून तात्काळ बारामतीकडे निघाल्या आहेत.

अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम :

१) जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानिमित्त बारामतीमध्ये आज अजित पवार यांच्या चार सभा होणार होत्या.

२) या सभांसाठी अजित पवार सकाळी साडेसातच्या सुमारास बारामतीला निघाले

३) मुंबई विमानतळावरून ते बारामतीकडे विमानाने रवाना झाले होते

४) नियोजनानुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास अजित पवार हे बारामतीमध्ये पोहचणार होते.

५) पावणे नऊच्या सुमारास विमान लँडिंग करताना अपघात झाला. विमान बारामती एअरपोर्टजवळ शेतात कोसळले.

६) अजित पवारांचे विमान कोसळले आणि त्याचे तुकडे होऊन भीषण आग लागली.

७) विमानामध्ये तीन ते चार स्फोट झाले असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले होते.

८) घटनास्थळावर तात्काळ पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या.

९) अजित पवारांसह सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

१०) सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक होती. या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली

११) या विमान अपघातामध्ये २ पायलट, अजित पवार, त्यांचा सुरक्षारक्षक आणि दोन स्वीय सहाय्यक यांचा मृत्यू झाला.

१२) अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार, युगेंद्र पवार बारामतीत पोहचले आहेत.

१३) सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार दिल्लीवरून रवाना झाले आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!