Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी..! सोन्याच्या दरात तब्बल 20 हजारांची घसरण, चांदी 1 लाखांनी स्वस्त; आजचा सोनं-चांदीचा भाव किती? A to Z माहिती

मोठी बातमी..! सोन्याच्या दरात तब्बल 20 हजारांची घसरण, चांदी 1 लाखांनी स्वस्त; आजचा सोनं-चांदीचा भाव किती? A to Z माहिती

Gold Silver Price Today : गेल्या पंधरा दिवसांपासून विक्रमी तेजीचा अनुभव देणाऱ्या सोने आणि चांदीच्या दरांना अचानक जोरदार ब्रेक लागला आहे. अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 20 हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात थेट 1 लाख रुपयांची मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ऐतिहासिक उच्चांक गाठलेले दर इतक्या वेगाने खाली आल्याने सराफ बाजारात खळबळ उडाली असून गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.

जळगाव सराफ बाजारात मोठी घसरण

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात दोन दिवसांत सुमारे 20 हजार रुपयांची घट झाली आहे. काही दिवसांपूर्वी 1 लाख 80 हजार रुपयांवर गेलेले सोने आता 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्याचप्रमाणे, चार लाखांच्या घरात पोहोचलेली चांदी थेट तीन लाख रुपयांवर घसरली आहे. इतकी मोठी घसरण क्वचितच पाहायला मिळते, त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघेही संभ्रमात आहेत.

नवी दिल्ली बाजारातही दबाव

राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतही सोन्या-चांदीच्या दरात तीव्र घसरण नोंदवली गेली. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर एका दिवसात 14 हजार रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 1 लाख 69 हजार रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच सोन्याने 1 लाख 83 हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. दरम्यान, चांदीचा भावही प्रति किलो 20 हजार रुपयांनी कमी होऊन 3 लाख 84 हजार 500 रुपयांवर आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातून नकारात्मक संकेत

आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंवर दबाव दिसून येत आहे. स्पॉट सोन्याचा दर 5 टक्क्यांहून अधिक घसरला असून, स्पॉट चांदीत तर 12 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. गुरुवारी दोन्ही धातूंनी जागतिक बाजारात विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आता जोरदार नफावसुली होत असल्याचे चित्र आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!