Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

NCP Merger : ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, 7 तारखेला विलीनीकरणाचा…’; शशिकांत शिंदेंचा खळबळजनक खुलासा

NCP Merger : ‘दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, 7 तारखेला विलीनीकरणाचा…’; शशिकांत शिंदेंचा खळबळजनक खुलासा

Shashikant Shinde On NCP Merger: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी आज या प्रकरणावर सविस्तर भाष्य करत अनेक धक्कादायक खुलासे केले. अजितदादा हयात असताना दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब झाले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

नेतृत्वाचा पेच आणि ‘अजितदादां’ची भूमिका
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास नेतृत्व कोण करणार? या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, “आता परिस्थिती बदलली आहे. अजितदादा आपल्यात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. विलीनीकरणाबाबत काही ठोस भूमिका ठरल्या होत्या. मात्र, दादांच्या जाण्यानंतर आता पुढे काय करायचे, यावर दोन्ही बाजूंच्या चर्चा होतील आणि मगच निर्णय घेतला जाईल. समोरचा गट कसा प्रतिसाद देतो, यावर सर्व काही अवलंबून आहे.”

हेही वाचा – 537 कोटींचा शंभूनगरीचा विकास आराखडा ही अजितदादांची दूरदृष्टी : केंदूरमध्ये मान्यवरांच्या भावना

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह?
महाराष्ट्र अजूनही अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरलेला नसताना, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी इतक्या घाईत का उरकला जात आहे, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, “दादांचे जाणे राज्यासाठी मोठे दुःख आहे. अशा वातावरणात शपथविधीचा निर्णय का आणि कशासाठी घेतला, याचे उत्तर सुनेत्रा वहिनी, त्यांचे कुटुंबीय किंवा मुख्यमंत्रीच देऊ शकतील.”

१७ जानेवारीच्या ‘त्या’ बैठकीचे रहस्य
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या १७ जानेवारीच्या बैठकीचा संदर्भ देत शिंदे यांनी स्पष्ट केले की, ही बैठक जयंत पाटील यांच्याकडे नव्हे, तर शरद पवारांच्या निवासस्थानी झाली होती. ७ तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा निर्णय झाला होता. इतर नेत्यांच्या संमतीबाबत विचारले असता, “मी सर्वांशी चर्चा केली आहे, तुम्ही काळजी करू नका, निर्णय माझा आहे,” असे ठाम आश्वासन अजितदादांनी दिले होते, असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

इतर नेत्यांचा विरोध होता का?
अजितदादांच्या गटातील काही बड्या नेत्यांचा या विलीनीकरणाला विरोध होता का? यावर बोलताना शिंदे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. “याबद्दल मला कल्पना नाही. आता सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही बाजूचे नेते एकत्र बसतील आणि चर्चा करतील. त्यानंतरच पुढची दिशा ठरवली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!