Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

537 कोटींचा शंभूनगरीचा विकास आराखडा ही अजितदादांची दूरदृष्टी : केंदूरमध्ये मान्यवरांच्या भावना

537 कोटींचा शंभूनगरीचा विकास आराखडा ही अजितदादांची दूरदृष्टी : केंदूरमध्ये मान्यवरांच्या भावना

शिक्रापूर : वढु बुद्रुक आणि परिसरात स्वराज्यरक्षक धर्मवरी छत्रपती संभाजी महाराज विकास आराखडा राबविण्यासाठी तब्बल ५३७ कोटींची तरतूद करुन आराखडा तात्काळ वास्तवात आणणे ही खरी उपमुख्यमंत्री अजितदादांची दूरदृष्टी व विकासदृष्टी. दादांमुळे या कामाला किती वेगाने गती मिळू शकली याचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे पाबळ-केंदूर गट हा राज्यात आदर्श करण्याचे माझे स्वप्नही दादांच्याच भरोषावर पाहिले होते. मात्र त्यांच्या पश्चात आता हे स्वप्न सत्यात आणण्याचे आव्हान माझ्या पुढे असून दादांच्या प्रेरणेने मी ते स्विकारल्याची भावना पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल शिवले यांनी केंदूर (ता.शिरूर) येथे व्यक्त केली.

स्व.अजितदादा पवार यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी केंदूर येथील ग्रामपंचायतपुढे सर्वपक्षीय भव्य सांत्वन सभा नुकतीच पार पडली. केंदूरच्या सरपंच अलका बापूसाहेब प-हाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सभेत माजी सरपंच प्रमोद प-हाड, सुनिल थिटे, सतीश थिटे, भरत साकोरे, रामशेठ साकोरे, अ‍ॅड.दत्तात्रय थिटे, अभिजित साकोरे, महादेव ताठे, उमेश साकोरे, राजेश थिटे, युवराज साकोरे, अंकुश शिवले, बाळासाहेब साकोरे, माऊली थिटे, बन्सीशेठ प-हाड, माजी सरपंच विमलताई थिटे, पंचायत समितीच्या उमेदवार सुचेता सनी थिटे, आशाताई संपत साकोरे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यात बोलताना श्री शिवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान सन २००३ मध्ये थिटेवाडी प्रकल्प उभारणी, सन २०१५ मध्ये केंदूर येथील संतश्रेष्ठ कान्हुराज महाराज तिर्थस्थळ दर्जा मंजुरी, केंदूर-पाबळ ही संयुक्त ६० कोटींची सोलर पाणी योजना मंजुरी, कोरेगाव भिमा-वढु बुद्रुक-वाजेवाडी-चौफुला-केंदूर-पाबळ रस्त्यासाठी मोठ्या निधीची मंजुरी हे सर्व पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांचेच योगदान असल्याचे मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाला सर्वपक्षीय सर्वस्तरांतील पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन रामभाऊ साकोरे यांनी केले.

दादांचे जागतिक शाळांचे स्वप्न पाबळ-केंदूर गटात मी पूर्ण करणार : शिवले

वावळेवाडी शाळेच्या धर्तीवर राज्यात ५ हजार शाळा उभारणीसाठी अजितदादांनी सन २०१९ च्या अर्थसंकल्पात १५०० कोटींची तरतूद केली होती. तेच स्वप्न मी आता पाबळ-केंदूर गटातील १४ गावांतील ४४ जिल्हा परिषद शाळांच्या निमित्ताने पुर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद निवडणूकीत उतरल्याचे श्री शिवले यांनी पत्रकारांना आवर्जून सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!