Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Who is Sunetra Pawar: महाराष्ट्राला मिळाली पहिली महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकि‍र्दीबद्दल महत्त्वाची माहिती

Who is Sunetra Pawar: महाराष्ट्राला मिळाली पहिली महिला उपमुख्यमंत्री; सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कारकि‍र्दीबद्दल महत्त्वाची माहिती

Who is Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात निधन झाले. पवार कुटुंबासह संबंध महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्का होता. बारामती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी ही मोठी हानी असल्याचे मानले जाते. पक्ष आणि पवार कुटुंबात आलेल्या रितेपणातून वाट काढण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जात आहे. याचसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड पक्षाकडून उपमुख्यमंत्रीपदी करण्यात आली आहे.

राज्यात आतापर्यंत १० जणांनी उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. पण उपमुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या सूनेत्रा पवार या पहिल्याच उपमुख्यमंत्री असतील.

अजित पवार यांचे महायुती सरकारमधील स्थान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आणि एकूणच पक्षाच्या हितासाठी त्यांचा उत्तराधिकारी लवकर नेमणे गरजेचे आहे, अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळेच निधनानंतर अवघ्या दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाला यातून मार्ग काढणे क्रमप्राप्त ठरत आहे. अजित पवारांचा उत्तराधिकारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारच असाव्यात असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्याकडे जी जबाबदारी होती, त्या जबाबदारीबाबत आम्हाला निर्णय करावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसांत लवकरात लवकर आम्हाला त्याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनाही बोलून, त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे.

कोण आहेत सुनेत्रा अजित पवार?

सुनेत्रा पवार यांचा जन्म (१८ ऑक्टोबर १९६३) मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातला. धाराशिवचे नेते, माजी मंत्री आणि शरद पवारांचे जुने स्नेही पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. सुनेत्रा पवार यांना लहानपणापासूनच राजकारण आणि समाजकारणाचा वारसा मिळाला होता. १९८० मध्ये त्यांचे अजित पवार यांच्याशी लग्न झाले. अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतरही सुनेत्रा पवार राजकारणापासून दूर होत्या. बारामतीमध्ये शेती आणि समाजकारणात त्यांचा सहभाग मात्र होता.

पर्यावरण आणि स्वच्छतेची आवड असणाऱ्या सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरणाशी निगडित काम करत आल्या आहेत.

तसेच बारामतीमधील महिलांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी टेक्सटाईल पार्कची सुरुवात केली. याज या पार्कमध्ये हजारो महिला काम करत आहेत. २००६ पासून टेक्सटाईल पार्कचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. तसेच त्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेवरही विश्वस्त म्हणून काम करत आहेत.

२०२४ ची लोकसभा आणि कौटुंबिक वाद

२०२३ साली अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत महायुती सरकारला पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री झाले. या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आणि अजित पवारांचा गट अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला.

२०२४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी दिली. पवार कुटुंबासाठी हा मोठा कसोटीचा काळ होता. या निवडणुकीत पवार कुटुंब सरळ सरळ दोन गटात विभागलेले दिसले. अजित पवारांचे सख्खे बंधू आणि त्यांच्या अडचणीच्या काळात नेहमी साथ देणारे श्रीनिवास पवारही शरद पवार यांच्या बाजूने होते. मात्र सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांना खंबीर साथ देत नेटाने लोकसभेचा प्रचार केला. मात्र त्यांचा विजय होऊ शकला नाही.

सुप्रिया सुळे यांना ७.३२ लाख मते मिळाली होती. तर सुनेत्रा पवार यांना ५.७३ लाख मते मिळाली होती. सुप्रिया सुळे यांनी १.५९ लाख मतांनी विजय मिळवला होता.
राज्यसभेच्या खासदार

लोकसभेत पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली. प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. या जागेवर १३ जून २०२४ रोजी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्या राज्यसभेच्या सदस्य झाल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!