Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Jayant Patil : अजितदादांचा विमान अपघात की घातपात? जयंत पाटलांनी व्यक्त केली मोठी शंका; नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil : अजितदादांचा विमान अपघात की घातपात? जयंत पाटलांनी व्यक्त केली मोठी शंका; नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil On Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता या घटनेच्या स्वरूपावर राजकीय वर्तुळातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या अपघाताच्या पद्धतीवर संशय व्यक्त केला असून, “विमान हवेत गरगर फिरून खाली कोसळणे अनाकलनीय आहे,” असं म्हटलं आहे.

‘ब्लॅक बॉक्स’मधूनच सत्य बाहेर येईल – जयंत पाटील
बारामती विमानतळावर झालेल्या त्या भीषण दुर्घटनेबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी माझ्या आयुष्यात अनेक विमान अपघात पाहिले किंवा वाचले आहेत. सहसा विमान धावपट्टीला धडकते किंवा तांत्रिक बिघाडामुळे कोसळते. मात्र, अजितदादांचे विमान हवेतच गरगर फिरून जमिनीवर आदळणे हे धक्कादायक आहे. मी या विषयातला तज्ज्ञ नाही, पण हा प्रकार संशयास्पद वाटतो. आता ‘ब्लॅक बॉक्स’मधील रेकॉर्डिंग आणि वैमानिकाचे शेवटचे शब्द समोर आल्यावरच यामागचे खरे सत्य उघड होईल.’ यापूर्वी ममता बॅनर्जी यांनीही यात घातपाताची शक्यता वर्तवली होती, मात्र शरद पवारांनी त्याचे राजकारण न करण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा –First Woman Deputy CM : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा अध्याय संपला?
अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला होता. खुद्द शरद पवारांनीही कबूल केले की, अजित आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली होती आणि १२ तारखेला एकत्रीकरणाची घोषणा होणार होती. मात्र, दादांच्या निधनानंतर समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अजितदादांच्या अस्थी विसर्जनानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांनी घेतलेला उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय आणि शरद पवारांची ‘मला काहीच माहित नाही’ ही भूमिका पाहता, आता विलीनीकरणाच्या आशा मावळल्याचे चित्र आहे.

सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा
मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असून सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाच्या मार्गातील सर्व कायदेशीर अडथळे दूर केले आहेत. दिलीप वळसे पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले आणि सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली. त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सोपवला आहे. काही वेळातच त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!