Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

First Woman Deputy CM : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

First Woman Deputy CM : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ; राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

First Woman Deputy CM : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात आज एका सुवर्ण अध्यायाची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढत, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची अधिकृत शपथ घेतली. या नियुक्तीमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने हे महत्त्वपूर्ण पद भूषवले आहे.

साधेपणाने पार पडला शपथविधी
राजभवनातील ‘दरबार हॉल’मध्ये आज शनिवारी एका अत्यंत साध्या सोहळ्यात हा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. कौटुंबिक पाठबळ म्हणून सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार त्यांच्यासोबत होते.

हेही वाचा – Rohit Pawar: सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या घडामोडीत रोहित पवार यांचं ट्विट; अजित पवारांबद्दल काय म्हणाले?

अकस्मात निधनानंतरची राजकीय अपरिहार्यता
२८ जानेवारी रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठा आघात झाला होता. पक्षाचे नेतृत्व आणि उपमुख्यमंत्रिपदाची धुरा कोणाकडे द्यायची, असा पेच निर्माण झाला होता. ३० जानेवारीपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर, पार्थ आणि जय पवार या दोघांनीही आपल्या मातोश्रींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. कुटुंबाच्या आणि पक्षाच्या आग्रहानंतर सुनेत्रा पवारांनी ही मोठी जबाबदारी स्वीकारण्यास होकार दिला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!