Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

FDA आयुक्त होताच तुकाराम मुंढेंचा दणका; नागपुरात भेसळखोरांवर मोठी कारवाई

FDA आयुक्त होताच तुकाराम मुंढेंचा दणका; नागपुरात भेसळखोरांवर मोठी कारवाई

FDA Nagpur raid : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच विभागात हालचालींना वेग आला आहे. नागपूरमध्ये एफडीएच्या पथकांनी विविध भागांत धडक छापेमारी मोहीम राबवत भेसळीचा संशय असलेले मोठ्या प्रमाणातील अन्नसाठे जप्त केले. या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ नागरिकांना मिळावेत, या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. छापेमारीदरम्यान मसाले, पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, पनीर, क्रीमसह विविध खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले. एकूण सहा हजार किलो आणि लिटरपेक्षा अधिक अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ४ लाख ७२ हजार ५७० रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

एफडीएच्या पथकाने विविध ठिकाणी कारवाई करत १ हजार १९६ किलो हळद आणि मिरची पावडर जप्त केली. या मालाची किंमत ३४ हजार ८०० रुपये आहे. तसेच ५४ हजार १८० रुपये किमतीचे तब्बल ४ हजार ६०० लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरही ताब्यात घेण्यात आले.

याशिवाय ५८ हजार २६० रुपये किमतीचे १९४ किलो क्रीम, १९ हजार २०० रुपये किमतीचे ६४ किलो पनीर आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुनेही तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. सर्व नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं एफडीएकडून स्पष्ट करण्यात आलं.

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए विभाग आता अधिक सक्रिय झाल्याची चर्चा नागपूरमध्ये रंगली आहे. केवळ कागदोपत्री कारवाई करणारा विभाग आता प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात अशाच आणखी कठोर मोहिमा राबवल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!