Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे हादरले! विषारी दारूमुळे २४ तासांत १३ जणांचा मृत्यू; हडपसर-पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

पुणे हादरले! विषारी दारूमुळे २४ तासांत १३ जणांचा मृत्यू; हडपसर-पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे तब्बल १३ जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फुगेवाडी परिसरात ८ जणांचा तर हडपसर भागात ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत्यू झालेल्या सर्वांना पोटदुखी, मळमळ आणि अचानक प्रकृती बिघडल्याची लक्षणे जाणवत होती. दोन जणांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी योगेश वानखेडे या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असले तरी पुण्यातील कायदा आणि बेकायदा दारू विक्रीवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पुण्यात कुणाचा मृत्यू?

राहुल शरद क्षीरसागर वय 45 वर्षे राहणार पांढरे मळा सर्वे नंबर 257 हडपसर पुणे, विजय. भू कुरलाल शर्मा वय 45 वर्षे राहणार पांढरी मळा ससाणे नगर हडपसर पुणे, अरुण डाडर –हडपसर, अशोक रमेश चव्हाण राहणार काळेपडळ, विजय भूकुरलाल शर्मा राहणार पांढरे मळा ससाणे नगर हडपसर

पिंपरी चिंचवड (फुगेवाडी,पिंपळे गुरव)

मृतांची नावे-

पाडुरंग फुगे, विजय प्रकाश राठोड, राजेंद्र प्रकाश राठोड, राजू रजपुत, अकबर पठाण, बाबा शेख, आनंद देसाई, आनंद निकाळजे

या दोघांची प्रकृती चिंताजनक

सुभाष डिगीकर – मेडी पाॅईट हॉस्पिटल, अक्षय अवसरमल – यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!