Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime : घटस्फोटाचा खटला अन् चारित्र्याचा संशय; पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या पतीनेचं केलं धक्कादायक कांड

Pune Crime :  घटस्फोटाचा खटला अन् चारित्र्याचा संशय; पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या पतीनेचं केलं धक्कादायक कांड

Pune Crime : पुण्यात कौटुंबिक वादातून एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणात महिलेच्या पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना खडकी बाजार येथील पोलिस वसाहतीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला अधिकारी पुणे पोलिसांच्या विशेष शाखेत सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती योगेश माधव बेरी (वय 38) हे खासगी कंपनीत नोकरी करतात. वैवाहिक आयुष्यातील मतभेदांमुळे दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. महिलेने पतीकडून होत असलेल्या कथित छळामुळे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता.

घटनेच्या वेळी महिला अधिकारी खडकीतील शासकीय निवासस्थानी एकट्या राहत होत्या. 27 मे रोजी रात्री त्या घरी परतल्यानंतर घरात आधीपासून उपस्थित असलेल्या पतीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आरोपीने प्रथम त्यांच्या डोळ्यांत राख फेकली आणि त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला.

हल्ल्यानंतर महिलेने आरडाओरडा केल्याने परिसरातील रहिवासी तत्काळ मदतीसाठी धावले. नागरिकांनी हस्तक्षेप करून आरोपीला पकडून ठेवले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि महिलेने अधिकृत तक्रार नोंदवली. या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यावर झालेल्या चाकूहल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, परिचित व्यक्तीशी सुरू असलेल्या संवादादरम्यान अचानक हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या पदाधिकाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. या प्रकरणातील आरोपी राम शेषराव बोडखे याच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेदरम्यान आरोपीही जखमी झाला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!