Today सोमवार, 2nd नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Baramati Crime: अजित पवारांच्या अंत्ययात्रेत चोरट्यांनी साधला डाव; 25 ते 30 लाखांचे दागिने लंपास

Baramati Crime: अजित पवारांच्या अंत्ययात्रेत चोरट्यांनी साधला डाव; 25 ते 30 लाखांचे दागिने लंपास

Baramati Crime: संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याच्या, अजित पवार यांच्या निधनाने शोकसागरात बुडालेला असताना, बारामतीत एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. साहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या अलोट गर्दीचा फायदा घेत निर्दयी चोरट्यांनी तब्बल १५ जणांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या ओरबाडल्या. एका बाजूला डोळ्यांतून अश्रू वाहत असताना दुसरीकडे चोरटे सोन्यावर हात साफ करत होते, या कृत्यामुळे बारामतीकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

२५ ते ३० लाखांचा ऐवज चोरीला
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडलेल्या या अंत्यसंस्कारासाठी लाखो समर्थक जमले होते. या अलोट गर्दीत चोरट्यांच्या टोळीने नियोजित डल्ला मारला. प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी सुमारे २५ ते ३० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दुखात बुडालेल्या समर्थकांना आपली लूट झाल्याचे लक्षात येईपर्यंत चोरटे पसार झाले होते.

हेही वाचा – ‘अजित पवार अपघातामागे काही षडयंत्र असेल, तर …’, अजित पवार विमान दुर्घटनेवर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

८ हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त तरीही चोरी?
प्रशासनाने या सोहळ्यासाठी सुमारे ८,००० पोलिसांचा भलामोठा फौजफाटा तैनात केला होता. मात्र, पोलिसांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. असे असतानाही, काही सजग नागरिकांनी धाडस दाखवत काही संशयितांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांकडून चौकशी सुरू
या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ पावले उचलत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मोहम्मद युनूस, राजकुमार आठवले, एजाज मिरावाले, मोहम्मद सिराज आणि बाळू बोत्रे यांच्यासह इतर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिस सध्या या टोळीची कसून चौकशी करत असून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने परत मिळवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!