Parth Pawar Mundhwa land scam: पुण्यातील मुंढवा येथील जमीन (Mundhwa Land Scam Case) गैर-व्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी यांचेच नाव नमूद करण्यात आले आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांच्यावरच आरोपांचे ठपके ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळाला आहे. दोषारोप पत्रामध्ये जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी फक्त शितल तेजवानी यांच्यावरती आरोप ठेवण्यात आले आहेत, आर्थिक गुन्हे विभागाच्या दोषारोप पत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाहीये. त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे.
पुण्यातील मुंढवा परिसरातील जमिनीचे गैरव्यवहार प्रकरण समोर आले होते, या प्रकरणात पार्थ पवारांवरती आरोप करण्यात आलेले होते. मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, या जमीन प्रकरणी फक्त शितल तेजवानी यांच्या विरोधात आरोप ठेवण्यात आलेले आहेत. आर्थिक गुन्हे विभागाकडून सादर केलेल्या दोषारोपपत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी कालच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर आज ही मोठी घडामोडी समोर आली आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे.(Mundhwa land scam case)
अंजली दमानियांची संताप व्यक्त करणारी पोस्ट
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र दाखल केले आहे. याबाबत संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र हा फक्त राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का?राजकारण्यांसाठी ‘न्याय’ हा शब्दच रद्द झालाय का? पुणे जमीन घोटाळा…. तपासाचे काहीच होत नाही….. त्यात शितल तेजवानी यांनी SP Civil Suit २२१३/२०२५ दाखल केला दिग्विजय पाटील यांच्या विरुद्ध आम्हाला पैसे मिळाले नाही म्हणून हा व्यवहार रद्द करा आणि दिग्विजय पाटील यांनी SP Civil Suit २३४७/२०२५ शितल तेजवानी यांच्या विरुद्ध, आम्हाला फसवलं म्हणून हा व्यवहार रद्द करा असा अर्ज केला आहे आणि कलेक्टर पुणे यांनी तर, हा व्यवहार ‘अवैध असून तो रद्द करण्यात यावा’ यासाठी अर्ज ८/१२/२०२५ रोजी अर्ज केला? मग साहेब पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार ? कशी देणार? का गुंडाळून टाकणार तुम्ही हा व्यवहार ? काय ही घाण ? ‘न्याय’ का शब्द राजकारण्यांना लागूच होत नाही का? असा सवाल दमानियांनी उपस्थित केला आहे.
तर ईओडब्ल्यू (खडक पोलीस) कडून पुणे जमीन घोटाळ्यात आरोपपत्र दाखल, पण तेही फक्त शीतल तेजवानीवरच! मग दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीचं काय? न्याय निवडक असतो का? हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे, अशीही दुसरी पोस्ट लिहली आहे.


