Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Traffic Challan Scam : सावधान! तुम्हाला व्हॉट्सॲपवर ‘ट्रॅफिक चलान’चा मेसेज आलाय? क्लिक करण्यापूर्वी ही बातमी वाचा, अन्यथा…

Traffic Challan Scam : सावधान! तुम्हाला व्हॉट्सॲपवर ‘ट्रॅफिक चलान’चा मेसेज आलाय? क्लिक करण्यापूर्वी ही बातमी वाचा, अन्यथा…

Traffic Challan Scam : सायबर गुन्हेगारांनी आता लोकांच्या भीतीचा फायदा घेण्यासाठी ‘डिजिटल चलान’ची नवी शक्कल लढवली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे बनावट मेसेज पाठवून एका तरुणाला तब्बल ४ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ‘NextGen mParivahan’ सारख्या अधिकृत वाटणाऱ्या नावाचा वापर करून ही फसवणूक केली जात असल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकी कशी झाली फसवणूक?
हरित नावाच्या तरुणाला व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला, ज्यावर परिवहन मंत्रालयाचा लोगो होता. त्यात ‘१००० रुपयांचे दंड थकीत आहे’ असे सांगून एक लिंक देण्यात आली होती. लिंकवर क्लिक करताच एक ‘APK’ फाईल (ॲप्लिकेशन) डाऊनलोड झाली. या ॲपमुळे तरुणाच्या फोनचे संपूर्ण नियंत्रण चोरट्यांकडे गेले. काही मिनिटांतच चोरट्यांनी त्याच्या ॲमेझॉन ई-वॉलेट आणि क्रेडिट कार्डचा ताबा घेतला. पाच मोठ्या व्यवहारांद्वारे ४.०५ लाख रुपये चोरून त्याचे ई-गिफ्ट कार्ड्स खरेदी करण्यात आले.

सायबर भामटे केवळ व्हॉट्सॲपच नाही, तर बनावट SMS आणि PDF चाही वापर करत आहेत. सायबर भामटे लायसन्स रद्द होईल किंवा अटकेची कारवाई होईल, अशी भीती घाततात. विश्वास संपादन करण्यासाठी वाहनाचा अर्धवट नंबर दिला जातो. तसेच दंड भरण्याच्या नावाखाली तुमच्या फोनमध्ये मालवेअर (Virus) घुसवले जाते, ज्यामुळे तुमचे सर्व पासवर्ड त्यांच्याकडे जातात.

फसवणूक टाळण्यासाठी ‘हे’ कराच

  • अधिकृत पोर्टल: चलान भरण्यासाठी नेहमी अधिकृत सरकारी वेबसाइटचाच वापर करा.
  • लिंक तपासा: ज्या लिंकच्या शेवटी .gov.in नाही, ती लिंक बनावट आहे असे समजा.
  • APK फाईल्स: व्हॉट्सॲपवर आलेल्या कोणत्याही फाईल्स डाऊनलोड करू नका. सरकारी यंत्रणा कधीही व्हॉट्सॲपवर फाईल्स पाठवत नाहीत.
  • QR कोड: दंड भरण्यासाठी कधीही अनोळखी व्यक्तीने पाठवलेला QR कोड स्कॅन करू नका.

फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुमची फसवणूक झाली, तर पहिले दोन तास (Golden Hours) अत्यंत महत्त्वाचे असतात. तातडीने १९३० या सायबर हेल्पलाईन नंबरवर कॉल करा. तसेच www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. याशिवाय, तातडीने बँकिंग व्यवहार आणि कार्ड्स ब्लॉक करा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!