Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची सखोल खातरजमा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला पुरुष लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या पडताळणीदरम्यान पुणे जिल्ह्यात तब्बल 1,201 पुरुष लाभार्थी आढळून आले आहेत. यामध्ये हवेली आणि पुणे तालुक्यात सर्वाधिक 487 लाभार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.
शासनाच्या निकषानुसार, जर कुटुंबात कोणीही सरकारी नोकरदार किंवा पेन्शनधारक असेल, तर त्या कुटुंबातील महिला लाभार्थी योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
मात्र, घरात असा कोणीही सदस्य नसेल किंवा त्यांना योजनेचा लाभ मिळत नसेल, तर संबंधित महिला पात्र लाभार्थी मानली जाणार आहे.
या निकषांनुसार पुणे जिल्ह्यात आता एकूण 2 लाख 25 हजार 360 महिला लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थ्यांना वगळून खऱ्या गरजू महिलांपर्यंतच योजनेचा लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर असल्याचं स्पष्ट होत आहे.


