Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मोठी बातमी! आता NA परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही; कोणाकडे देण्यात आले अधिकार? वाचा

मोठी बातमी! आता NA परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही; कोणाकडे देण्यात आले अधिकार? वाचा

NA Plot Rules 2026 : राज्य सरकारने जमीन अकृषिक (NA) करण्याच्या प्रक्रियेत ऐतिहासिक बदल केला आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मध्ये दुरुस्ती करून जिल्हाधिकाऱ्यांचे (Collector) बिगरशेती परवानगीचे अधिकार आता संपुष्टात आले असून, हे अधिकार संबंधित स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडे (Local Planning Authority) सोपवण्यात आले आहेत. १ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असली, तरी अनेक तांत्रिक मुद्द्यांवर स्पष्टता नसल्याने प्रशासकीय पातळीवर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

काय आहे नवा बदल?
शहरांलगतच्या गावांचा विकास वेगवान करण्यासाठी सरकारने महसूल अधिनियमातील कलम ४१ ते ४७ आणि १०८ ते १२० रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. यामुळे आता नागरिकांना एनए परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नियोजन प्राधिकरणच आता विकासासाठी हिरवा कंदील देणार आहे.

प्रशासकीय पातळीवर गोंधळ का?
महसूल विभागाने अधिकार काढून घेतले असले तरी, जमिनीचे रेकॉर्ड आणि कायदेशीर नोंदींबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत:

  • सातबारा आणि गाव नमुना नोंद: जमिनीचा वापर बदलल्यानंतर त्याची नोंद ‘गाव नमुना २’ मध्ये महसूल विभाग करणार की स्थानिक प्राधिकरण? याबाबत स्पष्ट निर्देश नाहीत.
  • वसुली: भोगवटा वर्ग-२ (Inam, Kul, Watan) जमिनींसाठी द्यावा लागणारा शासकीय नजराणा कोण वसूल करणार? तपासणी परवानगीपूर्वी होणार की नंतर, यावरही मौन पाळले आहे.
  • न्यायालयीन वादांची भीती: इतर हक्कातील दावेदारांची संमती न घेता परस्पर बांधकाम परवानगी दिल्यास उद्भवणाऱ्या कायदेशीर गुंतागुंतीची जबाबदारी कोणाची असेल, हे स्पष्ट झालेले नाही.

महसूल बुडण्याची शक्यता?
नव्या निर्णयानुसार, रहिवास, व्यापारी आणि औद्योगिक वापरासाठी एकदाच आणि सारखेच अधिमूल्य (Premium) आकारले जाणार आहे. पूर्वी या तिन्ही वापरांसाठी वेगवेगळे दर होते. या ‘एकसमान दर’ धोरणामुळे सरकारचा मोठा महसूल बुडण्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!