Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात धक्कादायक अपघात; भाजपच्या राष्ट्रीय नेत्याच्या आईला कारने उडवलं; फडणवीसांनी घेतली दखल

पुण्यात धक्कादायक अपघात; भाजपच्या राष्ट्रीय नेत्याच्या आईला कारने उडवलं; फडणवीसांनी घेतली दखल

Pune News : पुण्यात भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईचा गंभीर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सीएनजी पेट्रोल पंपावर भरधाव कारने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून, सध्या त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झाले आहे. या घटनेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, प्रकरणाची चौकशी करून तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

सीएनजी पंपावर थरारक घटना

शहजाद पूनावाला यांच्या आई रात्रीच्या सुमारास एका सीएनजी पेट्रोल पंपावर कारची वाट पाहत उभ्या होत्या. याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.

जाणूनबुजून धडक दिल्याचा आरोप

या प्रकरणात शहजाद पूनावाला यांनी कार चालकावर जाणूनबुजून धडक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आईच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

शहजाद पूनावाला यांची भावनिक पोस्ट

शहजाद पूनावाला यांनी लिहिले, “एका व्यक्तीने माझ्या आईला जाणूनबुजून धडक दिली. ती गंभीर जखमी झाली असून आरोपी पळून गेला आहे. माझ्या आईला लवकरच शस्त्रक्रियेची गरज आहे. या वयात तिच्यासोबत घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा. पुणे पोलिस आरोपीला अटक करतील आणि त्याला योग्य ती शिक्षा मिळेल, अशी मला अपेक्षा आहे.”

मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण

या घटनेनंतर मुख्यमंत्री कार्यालयाने एक्स (X) वर पोस्ट करत माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून, शहजाद पूनावाला यांच्याशीही थेट संवाद साधला आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!