Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar Plane Crash : ‘विमानातून बाहेर पडण्याची कुणीतरी धडपड करत होतं…’; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Ajit Pawar Plane Crash : ‘विमानातून बाहेर पडण्याची कुणीतरी धडपड करत होतं…’; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी घटनास्थळावरील सरपंचांच्या हवाल्याने एक खळबळजनक दावा केला आहे. विमान कोसळत असताना त्यातून एक व्यक्ती बाहेर पडण्यासाठी जीवाच्या आकांताने धडपड करत होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या दाव्यामुळे हा केवळ अपघात होता की घातपात, यावर आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिटकरींचा सवाल; सहावा देह कुठे गायब झाला?
या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद असली तरी, अमोल मिटकरी यांनी तांत्रिक विसंगतीवर बोट ठेवले आहे. “डीजीसीए (DGCA) च्या माहितीनुसार विमानात सहा जण प्रवास करत होते, मग घटनास्थळी केवळ पाचच मृतदेह कसे सापडले? तो सहावा व्यक्ती नेमका कोण होता आणि तो कुठे गायब झाला?” असा जळजळीत प्रश्न मिटकरींनी उपस्थित केला आहे. विमान कोसळण्यापूर्वी त्यातून कुणी उडी मारली होती का? याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा – काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत अजित पवारांच्या अस्थींचे पवित्र नद्यांमध्ये विसर्जन; देशव्यापी कलश यात्रेचे आयोजन

प्रत्यक्षदर्शी सरपंचांचा थरारक अनुभव
गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी हा अपघात डोळ्यांनी पाहिला असून त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली. आटोळे यांच्या म्हणण्यानुसार, अपघात होण्यापूर्वी विमानाने आकाशात दोन गिरक्या घेतल्या होत्या. “आम्ही जेव्हा विमानाकडे धावलो, तेव्हा त्याचा दरवाजा उघडा होता आणि निळी पँट घातलेला एक व्यक्ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, आम्ही तिथे पोहोचेपर्यंत विमानाचा भीषण स्फोट झाला,” असे सरपंचांनी सांगितले. सुरुवातीला हे विमान एखाद्या उद्योगपतीचे असावे असे ग्रामस्थांना वाटले होते, मात्र नंतर अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली.

अजित पवारांच्या मृत्यूबाबत केवळ त्यांचे निकटवर्तीयच नव्हे, तर सर्वसामान्य जनतेतूनही संशय व्यक्त केला जात आहे. या अपघातामागे काही षडयंत्र तर नाही ना? या दृष्टीने आता केंद्रीय तपास यंत्रणांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!