Today गुरूवार, 2nd जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Politics : शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’! पवारांना धक्का; पंढरपुरात ३ दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Politics : शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’! पवारांना धक्का; पंढरपुरात ३ दिग्गज नेते शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल सावंत यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपुरमध्ये होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनिल सावंत यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत पंढरपुरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि भगीरथ भालके हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अनिल सावंत हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी निर्णय घेत १२ एप्रिल रोजी ‘धनुष्यबाण’ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रवेशामुळे पंढरपुर आणि सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

पंढरपुरातील टिळक स्मारक मैदानावर शनिवारी दुपारी २ वाजता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. या मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यातील अनेक स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि शेकडो कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली.

या घडामोडींमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!