Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदेंना पत्र; काय आहे कारण?

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदेंना पत्र; काय आहे कारण?

Devendra Fadnavis : महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा राजकीय पुढाकार घेतला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदार आणि प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून या विधेयकाला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे.

या पत्राद्वारे उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि सुनिल तटकरे यांसारख्या नेत्यांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “हा ऐतिहासिक क्षण आहे, सर्वांनी एकमताने साथ द्यावी,” असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनीही हे विधेयक एकमताने मंजूर करण्याचे आवाहन केले आहे. 16 ते 18 एप्रिलदरम्यान संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, या अधिवेशनात महिलांसाठी 33% आरक्षण लागू करण्यासंदर्भातील सुधारित विधेयक मांडले जाणार आहे.

अर्जुन राम मेघवाल हे ‘नारी शक्ती वंदन कायदा’ संदर्भातील सुधारित विधेयक सादर करणार आहेत. या विधेयकानुसार लोकसभेतील जागांची संख्या 543 वरून वाढवून 850 करण्याची तरतूद आहे. त्यापैकी 815 जागा राज्यांसाठी तर 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असतील.

मात्र, या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी विशेष अधिवेशन लवकर बोलावल्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीबाबत आता संसदेत काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!