Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Crime : नाशिकमध्ये थरारक हल्ला! महिलेने एका व्यक्तीला दगडाने ठेचले; मिरची पूड अन् कोयत्याने वार

Nashik Crime : नाशिकमध्ये थरारक हल्ला! महिलेने एका व्यक्तीला दगडाने ठेचले; मिरची पूड अन् कोयत्याने वार

Nashik Crime : नाशिक मध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरू असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने आपल्या परिचिताला महामार्गाजवळ बोलावून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

माहितीनुसार, संबंधित महिलेने सुरज सोळंकी (वय ३७) यांना फोन करून भेटायला बोलावले. भेटताच तिने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली, दगडाने मारहाण केली आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सोळंकी गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

हल्ल्यानंतर महिला एका साथीदारासोबत मोटारसायकलवरून फरार झाली. ओळख लपवण्यासाठी तिने चेहरा ओढणीने झाकला होता, तसेच गाडीची नंबर प्लेटही झाकण्यात आली होती. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

घटनेवेळी महामार्गावरून जात असलेल्या संजय मोहिते यांनी तत्परता दाखवत गाडी थांबवली, घटनेचे चित्रीकरण केले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यांनी आरोपींचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला, मात्र ते मुंबईच्या दिशेने पळून गेले.

दरम्यान, जखमी सोळंकी यांच्या दुचाकीवर ‘औरत की इज्जत करो, औरत पर भरोसा मत करो’ असा मजकूर लिहिलेला असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!