Today शनिवार, 2nd मे 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Accident news : वानवडीत पुलावरून कार थेट कोसळली नाल्यात, लष्करी अधिकाऱ्याच्या धाडसामुळे वाचला चालकाचा जीव

Pune Accident news : वानवडीत पुलावरून कार थेट कोसळली नाल्यात, लष्करी अधिकाऱ्याच्या धाडसामुळे वाचला चालकाचा जीव

Pune Accident news : पुण्यातील वानवडी परिसरात आज सकाळी एक थरारक अपघात घडला. गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावरून एक चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, लष्करी अधिकारी नायर आशिष कुमार यादव यांच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे चालकाचा जीव वाचला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अपघातानंतर नाल्यात उतरून थेट मदत

सकाळी सुमारे दहाच्या सुमारास आशिष कुमार यादव पुलावरून जात असताना रस्त्यावर मोठी गर्दी दिसली. चौकशी केली असता नाल्यात चारचाकी कोसळल्याचे समजले. वाहनात हालचाल जाणवत असल्याने आत कोणी अडकले असावे, असा अंदाज घेत क्षणाचाही विलंब न करता त्यांनी थेट नाल्यात उतरून पाहणी केली.

कारमध्ये एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत अडकलेली दिसताच त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीची काच फोडून त्या जखमी चालकाला बाहेर काढले.

नाकातून रक्तस्राव

बाहेर काढताना चालकाच्या नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू होता. लष्करातील प्रशिक्षणाचा उपयोग करत यादव यांनी तातडीने रुमालाने नाकावर दाब देत रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला आणि जखमीला सुरक्षितरित्या नाल्याबाहेर काढले.

गाडीत दीड लाखांची रोकड

या कारमध्ये सुमारे एक ते दीड लाख रुपयांची रोकड असल्याचे आढळून आले. चालक शुद्धीवर आल्यानंतर आशिष कुमार यादव यांनी ती संपूर्ण रक्कम प्रामाणिकपणे चालकाकडे सुपूर्द केली. त्यानंतर टेम्पोच्या मदतीने जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांकडून तपास सुरू

अपघाताची माहिती मिळताच वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वानवडी बाजार पोलिस चौकीचे पीएसआय बाळासाहेब वाकडे यांनी सांगितले की, जखमी चालकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

दरम्यान, नाल्यात पडलेली कार बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी वेग, रस्त्याची अवस्था आणि पुलावरील संरक्षक कठड्यांची स्थिती यांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

नागरिकांकडून धाडसाचे कौतुक

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आशिष कुमार यादव यांच्या धाडसी, माणुसकीपूर्ण आणि प्रामाणिक कृतीचे विशेष कौतुक केले आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एक मोठी दुर्घटना टळली असून, हा प्रसंग समाजात मानवतेचा आणि धैर्याचा आदर्श ठरत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!