Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Solapur Crime News : सोलापुरातील प्रसिद्ध बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावरून मारली उडी

Solapur Crime News : सोलापुरातील प्रसिद्ध बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावरून मारली उडी

Solapur Crime News : सोलापूर शहरातील विजयपूर रोड परिसरात गुरुवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एकेकाळी सोलापुरात नावाजलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय 59) यांनी पनाश अपार्टमेंटच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हात जोडून प्रार्थना केली

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सदारंगानी गुरुवारी दुपारी स्वतःच्या चारचाकी वाहनातून विजयपूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये आले होते. वाहन आवारात उभे करून त्यांनी पायऱ्यांद्वारे थेट वरच्या मजल्याकडे जाण्याचा मार्ग धरला. काही वेळातच अपार्टमेंटच्या कठड्यावर हात जोडून उभा असलेला व्यक्ती नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी तत्काळ सुरक्षारक्षकाला माहिती दिली.

सुरक्षारक्षकाने सदारंगानी यांना खाली आणले. मात्र, “चावी वरच राहिली आहे” असा बहाणा करून ते पुन्हा वर गेले आणि काही क्षणांतच त्यांनी 17 व्या मजल्यावरून उडी घेतली.

सीसीटीव्हीत घटना कैद

हा संपूर्ण प्रकार अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उडी घेतल्यानंतर सुनील सदारंगानी यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. अपार्टमेंट परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या नंबरच्या आधारे पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला.

सुनील सदारंगानी हे काही दिवसांपूर्वी पत्नीसमवेत सोलापुरात आले होते आणि येथेच स्थायिक होण्याचा विचार करत होते. ते राजकुमार राठी यांचे जावई होते. त्यांना दोन मुले असून, एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. घटनेची माहिती मिळताच अमेरिकेत असलेला मुलगा सोलापूरकडे रवाना झाला आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मानसिक तणावाचा संशय

एकेकाळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मुलतानी बेकरीचे नाव अत्यंत प्रसिद्ध होते. मात्र काही वर्षांपूर्वी बेकरी बंद पडल्यानंतर सदारंगानी पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्यास गेले होते. मागील काही काळापासून ते आर्थिक अडचणींना सामोरे जात होते, तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते, अशी माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!