Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Online Fraud Compensation: ऑनलाइन फसवणूक झाल्यास आता RBI देणार भरपाई; पण ‘या’ अटी पाळाव्या लागणार, जाणून घ्या नवीन नियम

Online Fraud Compensation: ऑनलाइन फसवणूक झाल्यास आता RBI देणार भरपाई; पण ‘या’ अटी पाळाव्या लागणार, जाणून घ्या नवीन नियम

Online Fraud Compensation: डिजिटल व्यवहारांच्या युगात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढत असताना भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शुक्रवारी जाहीर केले की, ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेल्या ग्राहकांना आता 25 हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल. डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात असून, लवकरच या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जाणार आहेत.

आरबीआयने या मदतीसाठी एक निश्चित मर्यादा (Capping) लावली आहे. नवीन नियमांनुसार, ग्राहकाला मिळणारी भरपाई ही त्याच्या झालेल्या नुकसानीच्या ८५ टक्के किंवा २५,००० रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती दिली जाईल. जर तुमची ५०,००० किंवा १ लाख रुपयांची फसवणूक झाली, तरी तुम्हाला कमाल २५,००० रुपयेच मिळतील. मात्र, जर तुमचे नुकसान २०,००० रुपये झाले असेल, तर त्याच्या ८५ टक्के म्हणजेच १७,००० रुपये तुम्हाला परत मिळू शकतात.

‘एकदाच’ मिळणार संधी; जबाबदारीचेही होणार परीक्षण
महत्त्वाची बाब म्हणजे, ही भरपाई दरवर्षी किंवा प्रत्येक फसवणुकीवर मिळणार नाही. ग्राहकांनी स्वतः सतर्क राहावे आणि वारंवार चुका करू नयेत, यासाठी ही मदत आयुष्यात केवळ एकदाच दिली जाईल. तसेच, या प्रक्रियेत फसवणूक नेमकी कशी झाली आणि त्यात ग्राहकाची काही चूक होती का, याचेही परीक्षण केले जाणार आहे. २०१७ च्या जुन्या नियमाचा आढावा घेऊन आरबीआय आता ग्राहकांची जबाबदारी नव्याने निश्चित करणार आहे.

फसवणुकीच्या आकडेवारीने वाढवली चिंता
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षात कार्ड आणि इंटरनेट फसवणुकीची तब्बल १३,४६९ प्रकरणे नोंदवली गेली असून, यात ५.२ अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याआधीच्या वर्षी हा आकडा १४.५७ अब्ज रुपयांच्या घरात होता. फसवणुकीचे हे मोठे प्रमाण पाहता, ग्राहकांना संरक्षण देणे आवश्यक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या सुधारित नियमांबाबत लवकरच जनतेचा अभिप्राय घेतला जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!