Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय पक्षाचा, राष्ट्रीय अध्यक्षपदही सांभाळवं छगन भुजबळांची मागणी

Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय पक्षाचा, राष्ट्रीय अध्यक्षपदही सांभाळवं छगन भुजबळांची मागणी

Chhagan Bhujbal: सोमवारी आणि मंगळवारी सुनेत्रा पवार या मुंबईत येणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपद तुम्हीच सांभाळलं पाहिजे हे आम्ही त्यांना सांगणार आहोत असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. राष्ट्रीय अध्यक्षपद हे त्यांना दिले पाहिजे हे आमच्या महिला पदाधिकारी देखील म्हणत आहेत. पक्षाने सुनेत्रा पावर यांना उपमुख्यमंत्री आणि नेता बनवण्याचा निर्णय घेतला आहे असे भुजबळ म्हणाले. हा एकटा तटकरे यांचा निर्णय नव्हता असेही भुजबळ म्हणाले.

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा सर्व पक्षाचा होता
बाळासाहेब ठाकरे यांनी मला महापौर केलं होतं. शिवसेनेत असताना दोन वेळा मी महापौर झालो होतो. महापौर आणि आमदार दोन्ही होतो असे मंत्री छगन भुजबळ म्हणाले. राजकारण हे बदलत असतं, मुख्यमंत्री बदलतात प्रधानमंत्री बदलतात, महापौर बदलले असतील असे भुजबळ म्हणाले. निवडून आलेले लोक आहेत त्यांच्याकडे काय पुरावे आहेत. यांवर काहीच बोललं न बरं. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा सर्व पक्षाचा होता. एकटा तटकरे यांचा निर्णय नव्हता. सारखं सारखं तुम्ही देखील विचारता. पक्षाने उपमुख्यमंत्री आणि नेता बनवण्याचा निर्णय घेतला आहे असे भुजबळ म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर 29 जानेवारीला अजित पवार यांच्यावर बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांच्या जागी राज्याचे उपमुख्यमंत्री कोण होणार? असी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्यानंतर 31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावरुन देखील काही नेत्यांनी टीका केली होती. शपथ घेण्यासाठी एवढी घाई का केली? असे सवाल उपस्थित केले जात होते. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ या नेत्यांनी शरद पवारांच्या पक्षासोबत या शपथविधी सोहळ्याबद्दल कोणतीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात आणि एकुणच पवार कुटुंबात नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!