Islamabad Blast: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मोठा स्फोट झाला आहे, या स्फोटामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला असून, 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं वृत्त समोर येत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार इस्लामाबादच्या तरलाई परिसरात असलेल्या इमाम बारगाह खदीजत-उल- कुबरामध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बाचाव पथक तातडीनं घटनास्थळी हजर झालं. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट नमाज सुरू असतानाच झाला आहे.
50 जणांचा मृत्यू , 70 पेक्षा जास्त लोक जखमी
या स्फोटामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मात्र हा स्फोट कोणी घडवून आणला? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्यापपर्यंत या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये.
इस्लामाबादच्या सुरक्षा व्यव्यस्थेमध्ये मोठी वाढ
दरम्यान या स्फोटनानंतर आता इस्लामाबादच्या सुरक्षा व्यव्यस्थेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं ज्या परिसरात ही घटना घडली आहे, तो संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात घेतला असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुन्हा एखादी अशी घटना घडू नये, यासाठी आता पाकिस्तानमधील सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं पहायला मिळत आहे. मशिदीमध्ये नमाज सुरू असतानाच हा स्फोट झाल्याचं वृत्त समोर येत आहे.
देशभरात भीतीचं वातावरण
पाकिस्तानी मिडिया डॉन न्यूजने दिलेल्या माहितीनुसार नमाज सुरू असातना हा स्फोट झाला आहे, या स्फोटामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. जखमी लोकांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटानंतर संपूर्ण शहरात आणीबाणीची घोषणा करण्यात आली असून, हा स्फोट नेमका कोणी घडवून आणला? त्या मागचा उद्देश काय होता, याचा शोध आता सुरू झाला आहे. या स्फोटानंतर देशभरात भीतीचं वातावरण पसरलं असून, मोठा तणाव पहायला मिळत आहेत.


