पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमी, नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक (सामान्य व्यवस्थापन आणि रणनीती) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२६ ही असणार आहे.
संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 160000 पर्यंत पगार मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. 68 वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक (सामान्य व्यवस्थापन आणि रणनीती)
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 70,000/- ते रु. 1,60,000/- पर्यंत.
– वयोमर्यादा : ६८ वर्षांपर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ फेब्रुवारी २०२६.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://ddpdoo.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


