Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Latur ZP Result: लातूरच्या ‘मिनी मंत्रालयात’ मनसेचा करिष्मा! पानगाव गटात मिळवला ऐतिहासिक विजय

Latur ZP Result: लातूरच्या ‘मिनी मंत्रालयात’ मनसेचा करिष्मा! पानगाव गटात मिळवला ऐतिहासिक विजय

Latur ZP Result: मराठवाड्याच्या राजकीय पटलावर आज एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. प्रस्थापित पक्षांच्या बालेकिल्ल्यात भगवे वादळ निर्माण करत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लातूर जिल्हा परिषदेत आपले खाते उघडले. रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटात डॉ. सुनील नागरगोजे यांनी मिळवलेला विजय हा या निवडणुकीतील सर्वात मोठा ‘उलटफेर’ मानला जात आहे.

पंचायत समितीतही ‘इंजिन’ सुसाट
मनसेची ही झेप केवळ जिल्हा परिषदेपुरती मर्यादित राहिली नाही, तर पंचायत समितीच्या रिंगणातही मनसेने आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

  • कोस्टगाव गण: मनसेच्या श्रीदेवी गालफाडे यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली.
  • पानगाव गण: मोनिका रवी सूर्यवंशी यांनी बाजी मारत पंचायत समितीवर मनसेचा झेंडा फडकवला.

प्रशासक राजचा अंत; लोकशाहीचा उत्सव
गेल्या ३६ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर मार्गी लागल्या आहेत. ७ फेब्रुवारीला पार पडलेल्या मतदानानंतर आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ झाला. ५९ जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समिती जागांसाठी झालेल्या या लढतीत काँग्रेस-भाजप यांसारख्या दिग्गज पक्षांना मनसेने दिलेली झुंज आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सूचक मानली जात आहे. राज ठाकरेंचा करिश्मा आणि कार्यकर्त्यांची मेहनत यामुळेच लातूरमध्ये हे यश मिळाले, अशी भावना विजयी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. या निकालामुळे लातूरच्या राजकारणात आता ‘मनसे फॅक्टर’ अधिक प्रबळ झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!