Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nirmala Nawale : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! अटीतटीच्या लढतीत कारेगावच्या माजी सरपंच निर्मलाताई नवले यांचा पराभव

Nirmala Nawale : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का! अटीतटीच्या लढतीत कारेगावच्या माजी सरपंच निर्मलाताई नवले यांचा पराभव

Nirmala Nawale : शिरुर पंचायत समितीच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत अखेर निकाल समोर आले असून, यामध्ये कारेगावच्या माजी सरपंच निर्मलाताई नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून त्या निवडणुकीला उभ्या होत्या. निर्मला नवले या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सुरुवातीपासूनच भाजप उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. येथे भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले असून, निर्मलाताई नवले यांना अपेक्षित मते मिळवण्यात यश आले नाही. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना 300 मतांनी पराभूत केले.

निर्मलाताई नवले यांना एकूण 6,564 मते
मतमोजणीच्या अंतिम आकडेवारीनुसार, निर्मलाताई नवले यांना एकूण 6,564 मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या स्वातीताई पाचुंदकर (भाजप) यांनी 17,575 मते मिळवून मोठा विजय संपादन केला. तसेच मनीषाताई पाचंगे यांनी 6,893 मते घेत निर्मलाताईंना मागे टाकले. या तिरंगी आणि चौरंगी लढतीत मतांचे विभाजन झाल्याने आणि भाजपच्या आक्रमक प्रचारामुळे निर्मलाताईंना आपली जागा टिकवता आली नाही.

सामाजिक कार्यात असूनही अपयश
निर्मलाताई नवले या गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सक्रिय आहेत. महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांसाठी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. जनतेशी थेट संपर्क आणि जुन्या कार्यकर्त्यांची फळी ही त्यांची मोठी ताकद मानली जात होती. मात्र, निवडणुकीच्या रणांगणात प्रस्थापित सत्ताधाऱ्यांचे तगडे आव्हान आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे त्यांना या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!