Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Police Transfer: पुणे पोलीस दलात मोठा फेरबदल! १८ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक बदलले; पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती

Pune Police Transfer: पुणे पोलीस दलात मोठा फेरबदल! १८ पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक बदलले; पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती

Pune Police Transfer: पुणे शहर पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयानुसार शहरातील १८ महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. कोथरूड, डेक्कन, फरासखाना, वानवडी, लष्कर आणि विश्रांतवाडी यांसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांना आता नवे वरिष्ठ निरीक्षक मिळाले आहेत.

कोथरूड, डेक्कन आणि फरासखान्यात नवे अधिकारी

नव्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर फरासखाना गुन्हे शाखेत कार्यरत असलेले अरुण घोडके यांच्याकडे कोथरूड पोलीस ठाण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांची काळेपडळ पोलीस ठाण्यात बदली झाली असून, वाहतूक शाखेतील रुणाल मुल्ला यांची डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अनेक पोलीस ठाण्यांमध्ये जबाबदाऱ्यांची अदलाबदल

मानसिंग पाटील यांची काळेपडळहून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. लोणी काळभोरचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्याकडे विश्रांतवाडी पोलीस ठाण्याची धुरा सोपविण्यात आली आहे. विश्रांतवाडीचे संतोष खेतमाळस यांची लष्कर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतील पंडीत रेजितवाड यांची वानवडी पोलीस ठाण्यात, तर संजय करनूर यांची नऱ्हे पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. प्रदीप पवार यांची लोणी काळभोर येथे नियुक्ती झाली असून नवनाथ जगताप यांच्याकडे विश्रामबाग पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

गुन्हे शाखेतही मोठे बदल

पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतही महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, राहुलकुमार खिलारे, भाऊसाहेब पाटील, आसाराम शेटे आणि नुकतेच पुणे पोलीस दलात रुजू झालेले संतोष कोळी यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय उत्तम नामवाडे यांची विशेष शाखेत बदली झाली असून वाहतूक शाखेतील संगीता जाधव यांची वानवडी पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

काही अधिकाऱ्यांची पुण्याबाहेर बदली

या बदल्यांमध्ये काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुणे शहराबाहेरही नियुक्ती देण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुमार घाडगे यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) बदली झाली आहे. तर विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगेश हांडे यांची मुंबई पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आले आहे.

कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न

पोलीस प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान करणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करणे, या उद्देशाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही जम्बो बदली यादी जाहीर केली आहे. या बदल्यांमुळे शहरातील पोलीस यंत्रणेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!