Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पाबळ-केंदूर गटात प्रफुल्ल शिवले यांचा झंझावात; 19623 मताधिक्याने मिळवला ऐतिहासिक विजय

पाबळ-केंदूर गटात प्रफुल्ल शिवले यांचा झंझावात; 19623 मताधिक्याने मिळवला ऐतिहासिक विजय

Praphull Shivale : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणसंग्रामात पाबळ-केंदूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्लदादा शिवले यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत शिवले यांनी 19623 इतके विक्रमी मतदान मिळवून आपल्या विरोधकांवर मात केली आहे. त्यांच्या या विजयामुळे पाबळ-केंदूर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून विरोधकांचे पानिपत झाले आहे.

विकासाच्या राजकारणाला मतदारांची पसंती
प्रफुल्ल शिवले यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात केलेले उल्लेखनीय कार्य या विजयाचे मुख्य आधारस्तंभ ठरले आहेत. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ विकास, पाणी प्रश्न, रस्ते आणि ग्रामस्वच्छता यांसारख्या मूलभूत कामांमुळे त्यांची ‘सर्वसामान्यांचा नेता’ ही प्रतिमा मतदारांनी अधोरेखित केली. दिलीप वळसे पाटील यांचे मार्गदर्शन आणि आमदार माऊली कटके यांच्या रणनीतीमुळे राष्ट्रवादीला या गटात मोठे संघटनात्मक बळ मिळाले होते.

प्रतिष्ठेच्या लढतीत विरोधकांचा पराभव
या निवडणुकीत प्रफुल्ल शिवले यांच्या विरोधात विकास गायकवाड रिंगणात होते, मात्र त्यांना केवळ ७,५०४ मतांवर समाधान मानावे लागले. पाबळ गणातून वंदना प्रकाश पवार आणि केंदूर गणातून सुचेता सनी थिटे यांच्या उमेदवारीने राष्ट्रवादीची व्यूहरचना अधिक भक्कम झाली होती, ज्याचा थेट फायदा शिवले यांना झाला.

पाबळ-केंदूर परिसरात कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण
गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरू झालेल्या मतमोजणीत शिवले यांनी पहिल्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. त्यांच्या विजयाची घोषणा होताच पाबळ-केंदूर परिसरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या शिवले यांच्याकडून आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!