Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Paithan Crime: पैठणमध्ये खळबळ! सरपण आणायला गेलेल्या पत्नीची पतीनेच कुऱ्हाडीने केली हत्या; नंतर स्वतःच…

Paithan Crime: पैठणमध्ये खळबळ! सरपण आणायला गेलेल्या पत्नीची पतीनेच कुऱ्हाडीने केली हत्या; नंतर स्वतःच…

Paithan Crime: पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरामध्ये बुधवारी (३ जून) सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. सरपण (जळाऊ लाकडे) गोळा करण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन एका पतीने आपल्याच पत्नीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. या भयंकर कृत्यानंतर आरोपी पतीने स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पैठण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

जंगलात नेऊन केला जीवघेणा हल्ला
या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव मंदाबाई सुरेश अंगारखे (वय ४५ वर्षे, रा. गांगलवाडी, नारळा, ता. पैठण) असे आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आरोपी पती सुरेश अंगारखे हा पत्नी मंदाबाई यांना सोबत घेऊन संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील दाट झाडी असलेल्या भागात लाकडे गोळा करण्यासाठी गेला होता. तिथे पोहोचल्यानंतर, पूर्वनियोजित कटानुसार सुरेशने सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने मंदाबाई यांच्या डोक्यावर आणि शरीरावर सपासप तीन वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, मंदाबाई गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

“मी बायकोला कायमचे संपविले…”
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी सुरेश अंगारखे हा पळून न जाता थेट पैठण पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने स्वतःच पोलिसांना, “मी माझ्या बायकोला कायमचे संपविले आहे,” असे सांगत घडलेला सगळा प्रकार कबूल केला. आरोपीच्या या धक्कादायक कबुलीमुळे पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आणि पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाले.

पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव सारंग, ऋषिकेश तळेकर, तसेच पोलीस अंमलदार शुभम पाटील आणि कल्याण ढाकणे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. तसेच, हत्येसाठी वापरण्यात आलेली रक्ताने माखलेली कुऱ्हाडही पोलिसांनी जप्त केली आहे.

हत्येचे गूढ अद्याप कायम
पतीने पत्नीचा एवढ्या क्रूरपणे खून का केला? यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पैठण पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, हत्येचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या अत्यंत गंभीर घटनेमुळे पैठण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!