Today गुरूवार, 30th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune MHADA Lottery: आज ठरणार तुमचं नशीब! पुण्यात म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी; घरबसल्या पाहा रिझल्ट

Pune MHADA Lottery: आज ठरणार तुमचं नशीब! पुण्यात म्हाडाच्या 4 हजार घरांची लॉटरी; घरबसल्या पाहा रिझल्ट

Pune MHADA Lottery: स्वतःच्या हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरणार आहे. म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण मंडळांतर्गत येणाऱ्या ४,१८६ सदनिकांची बहुप्रतिक्षित सोडत आज, १० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर पडलेला हा गृहप्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.

कुठे आणि कशी होणार सोडत?

  • स्थळ: शरदचंद्र पवार सभागृह, पुणे जिल्हा परिषद.
  • वेळ: आज दुपारी १२:०० वाजता.
  • उपस्थिती: म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या ऑनलाईन उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
  • लाईव्ह प्रक्षेपण: जे नागरिक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी म्हाडाच्या अधिकृत YouTube चॅनेलवर ही सोडत थेट पाहता येईल.

जिल्हानिहाय व्याप्ती आणि घरांचे प्रकार
या सोडतीचा लाभ केवळ पुण्यालाच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांनाही मिळणार आहे:

  • जिल्हे: पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली.
  • सर्वसमावेशक योजना (20%): ३,३२२ सदनिका.
  • सामाजिक गृहनिर्माण योजना (15%): ८६४ सदनिका.
Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!