Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Metro Line 3: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचे स्टेअरिंग महिलांच्या हातात; शंभर महिला ट्रेन पायलटची नेमणूक

Pune Metro Line 3: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोचे स्टेअरिंग महिलांच्या हातात; शंभर महिला ट्रेन पायलटची नेमणूक

Pune Metro Line 3: पुणे शहरातील तिसरा मेट्रो मार्ग म्हणजेच माण, हिंजवडी ते शिवाजनीगर (पिंक लाईन) ही मेट्रो सेवा प्रत्यक्षात मार्गावर धावण्यासाठी संबंधित कंपनीचे प्रयत्न सुरु आहेत. या मेट्रोचे स्टेअरिंग महिलांच्या हातात देण्यात येणार आहे. अभियंता असलेल्या तरुणींना मेट्रोचे सारथ्य करण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात शंभर महिला ट्रेन पायलटची नेमणूक केली असून, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने या प्रकल्पाच्या संचलन आणि देखभाल करणार आहे.

सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून आकाराला येत असलेल्या या प्रकल्पात टाटा आणि सीमेन्स यांसारख्या कंपन्यांचा सहभाग आहे. मात्र, केवळ महिलांच्या हाती संचलनाची धुरा सोपवण्याचा हा निर्णय जागतिक रेल्वे क्षेत्रात ‌’अद्वितीय उपक्रम‌’ म्हणून ओळखला जाणार आहे. या ट्रेन पायलट महिलांच्या निवडीसोबतच त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष ‌’प्रोटोकॉल‌’ तयार करण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणापासून ते प्रवासापर्यंतच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही कंपनी घेणार आहे. हा प्रकल्प केवळ वाहतुकीचे साधन नसून तो महिला सक्षमीकरणाचे जागतिक प्रतीक ठरेल, असा विश्वास ‌‘पीएमआरडीए‌’ने व्यक्त केला.

दरम्यान, हा मार्ग मार्च 2026 मध्ये सुरु करण्यासाठी संबंधित कंपनीकडून प्रयत्न सुरु आहेत. तांत्रिक आणि सिग्नलचे काम झाले आहे. त्यानुसार या कामाचे प्रशिक्षण संबंधित महिलांना देण्यात येत आहे. तसेच, या कामाची माहिती व कामाचे स्वरुप समजून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मेट्रोची सुुरुवात झाल्यानंतर त्याबाबतचे सर्व नियंत्रण हे या महिलांचे असणार आहे.

फ्रेंच कंपनीकडून प्रशिक्षण

पुणे व परिसरातील बी.टेक इंजिनिअर अथवा संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना मुलाखतीद्वारे निवडले जाते. फ्रेंच येथील किओलिस या कंपनीकडून त्याचे नियंत्रण राहणार आहे. या उमेदवारांकडून चार महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करुन घेतले जाते. त्यातून उमेदवार निवडले जातात. सध्या या सर्व महिला पायलटना थेट ट्रेन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. माण डेपो येथे त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. त्यानंतर त्यांची शारीरिक तंदुरुस्ती चाचणी घेतली जाते. पायलट म्हणून निवड झालेल्या तरूणींच्या चेहऱ्यावर या ‌‘हटके‌’ काम शिकत असल्याचा आनंद दिसून आहे.

40 मिनिटांत अंतर पार

हिंजवडीतील आयटी हबमधून शिवाजीनगरला पोहोचण्यासाठी रस्ते मार्गाने दीड तासांचा वेळ लागतो. मेट्रोमुळे हे अंतर अवघ्या 40 मिनिटांत पार करणे शक्य होईल. यामुळे लाखो आयटी कर्मचार्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक समावेशकता यांचा मेळ घालत ‌‘पीएमआरडीए‌’ने पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक आणखी बळकट केली आहे.

अशी आहे मेट्रो

मेट्रो लाईन 3 : पीएमआरडीए, टाटा आणि सीमेन्स

मार्ग: हिंजवडी (मेगापोलिस सर्कल) ते शिवाजीनगर (दिवाणी न्यायालय)

एकूण लांबी: 23 किमी (पूर्णतः उन्नत मार्ग)

स्थानके: 23 अत्याधुनिक स्थानके

यंत्रणा: 22 ॲल्स्टॉम मेट्रो ट्रेन

सद्यस्थिती ः स्ट्रक्चर काम पूर्ण, चाचणी सुरु

मेट्रोच्या संंबंधित सर्व यंत्रणांकडून वेळेत पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यापैकी एक असलेल्या मेट्रो ड्राईव्ह करण्यासाठी शंभर महिलांची नेमणूक केली असून, पहिल्या टप्प्यात 50 जणांची निवड देखील केली आहे. त्यांचे अंतिम प्रशिक्षण सुरु आहे.

अनिल सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे सिटी मेट्रो रेल लिमीटेड

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!