Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Job News ! महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संस्थेत नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

Job News ! महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संस्थेत नोकरीची संधी; ऑनलाईन करता येणार अर्ज…

पुणे : महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आयुष, मुंबई येथे ट्यूटर-शिक्षक (१,१०० पदे) आणि कनिष्ठ रहिवासी (४४० पदे) यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्र येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : ट्यूटर-शिक्षक (१,१०० पदे) आणि कनिष्ठ रहिवासी (४४० पदे).
– रिक्त पदे : एकूण १५४० पदे.

– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
– शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस.

– वेतन / मानधन : ट्यूटर: रु. ८०,०००/- आणि कनिष्ठ रहिवासी: रु. ७९,१७३/-.
– वयोमर्यादा : कमाल वय ७० वर्षे.

– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
– अर्ज शुल्क : खुल्या वर्गासाठी: रु. १०००/- आणि राखीव वर्गासाठी: रु. ९००/-.

– ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १६-०२-२६.
– ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६-०२-२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत).

– शुल्क भरण्याची शेवटची तारीख : २६-०२-२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत).

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://dmer.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!