पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, केंद्रीय विद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
केंद्रीय विद्यालय, वाशिम येथे पदव्युत्तर शिक्षक (PGT), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT), प्राथमिक शिक्षक (PRT), समुपदेशक, विशेष शिक्षक, संगणक प्रशिक्षक, डॉक्टर (MBBS), नर्स या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वाशिम येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही २३, २४, २५ आणि २६ फेब्रुवारी या कालावधीत घेतली जाणार आहे.
त्यासाठी पीएम श्री केंद्रीय विद्यालय वाशिम, नवीन पोलिस मुख्यालय जवळ, पोलिस ग्राऊंड, सिव्हिल लाइन क्षेत्र, वाशिम – 444505 येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://washim.kvs.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


