Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanjay Raut: ‘नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब!’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

Sanjay Raut: ‘नरेंद्र भी गायब, सिलेंडर भी गायब!’; गॅस टंचाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

Sanjay Raut: आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता थेट भारतीय स्वयंपाकघरांना बसू लागला आहे. या गंभीर परिस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. “देशात सध्या ‘नरेंद्र भी गायब आणि सिलेंडर भी गायब’ अशी स्थिती आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

माझ्या घरातही सिलेंडर नाही – राऊतांची व्यथा
गॅस टंचाईची दाहकता सांगताना संजय राऊत यांनी स्वतःच्या घराचे उदाहरण दिले. “माझ्या पत्नीला गेल्या दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये. महानगर गॅसची सुविधा असली, तरी अतिरिक्त सिलेंडरची गरज प्रत्येकाला लागते. आज सकाळपासून मला ६०-७० लोक भेटले, जे केवळ सिलेंडर कुठे मिळेल, हेच विचारत होते,” असे सांगत त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य मांडले.

‘नोटाबंदीसारखी भयंकर स्थिती’
देशभरातील परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, आज मुंबई, दिल्लीपासून ते अगदी जम्मूपर्यंत सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. “नोटाबंदीच्या काळात रांगेत उभे राहून लोक दगावले होते, तीच भीती आता सिलेंडरच्या रांगेबाबत निर्माण झाली आहे. लोकांना रांगेत उभे करणे आणि त्यांना त्रास देणे, हा भाजपचा छंद बनला आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

हेही वाचा –

पंतप्रधानांच्या आवाहनाचा घेतला समाचार
पंतप्रधानांनी ‘कोविडप्रमाणेच ही परिस्थिती सांभाळून घेऊ, नागरिकांनी घाबरू नये’ असे आवाहन केले होते. यावर राऊतांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “हो, कोविडमध्ये त्यांनी देश कसा सांभाळला हे आपण पाहिले आहे. गंगेत प्रेते वाहत होती आणि गुजरातच्या स्मशानभूमीत जागा उरली नव्हती. आंतरराष्ट्रीय राजकारणातील अपयशामुळेच आज भारतीयांवर ही वेळ आली आहे.”

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!