Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

LPG Booking Methods: गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही; सरकारने सांगितले बुकिंगचे ‘हे’ 5 सोपे मार्ग

LPG Booking Methods: गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही; सरकारने सांगितले बुकिंगचे ‘हे’ 5 सोपे मार्ग

LPG Booking Methods: देशभरात एलपीजी (LPG) सिलिंडर्ससाठी गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाच, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सध्याच्या टंचाईच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयाने ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत घरगुती गॅस बुकिंगच्या सोप्या पद्धती स्पष्ट केल्या आहेत. ग्राहकांना आता गॅस एजन्सीवर जाऊन तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज नसून, ते 5 विविध डिजिटल माध्यमांचा वापर करून आपले बुकिंग सुरक्षित करू शकतात.

घरबसल्या बुकिंगचे 5 डिजिटल पर्याय
पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, Bharat Gas, Indane आणि HP Gas या कंपन्यांच्या ग्राहकांसाठी खालील सुविधा उपलब्ध आहेत:

  • WhatsApp: कंपनीने दिलेल्या अधिकृत क्रमांकावर मेसेज करून बुकिंग करता येईल.
    मिस्ड कॉल (Missed Call): नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल देऊन सिलिंडर बुक करता येतो.
  • IVRS/SMS: इंटरअॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टमद्वारे कॉल करून किंवा एसएमएस पाठवून प्रक्रिया पूर्ण करता येते.
  • मोबाईल ॲप्लिकेशन्स: ‘Hello BPCL’, ‘Indian Oil One’ आणि ‘HP Pay’ यांसारख्या ॲप्सचा वापर करून एका क्लिकवर बुकिंग शक्य आहे.
  • अधिकृत वेबसाइट्स: संबंधित कंपन्यांच्या पोर्टलवर (उदा. my.ebharatgas.com, cx.indianoil.in, myhpgas.in) जाऊन ऑनलाइन नोंदणी करता येते.

रांगांमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकारचे आवाहन
देशाच्या अनेक भागांत नागरिक पहाटे 3:00 वाजेपासून रांगेत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. काही ग्राहकांनी तीन-तीन दिवस रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. या पार्श्वभूमीवर, मंत्रालयाने या डिजिटल पर्यायांचा वापर करण्यावर भर दिला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) ही प्रक्रिया अत्यंत सुलभ केली असून, यामुळे वितरकाच्या केंद्रावर जाण्याची कसरत वाचणार आहे. गॅस टंचाईच्या अफवांवर विश्वास न ठेवता, डिजिटल माध्यमातून बुकिंग करून आपला क्रमांक निश्चित करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!