Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Telangana News: धक्कादायक! लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले; तेलंगणातील धक्कादायक प्रकार

Telangana News: धक्कादायक! लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले; तेलंगणातील धक्कादायक प्रकार

Telangana News: तेलंगणाच्या घाटकेसर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. एका एचआयव्ही पॉझिटिव्ह तरुणाने लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला आपल्या एड्सने संक्रमित इंजेक्शन टोचल्याची घटना घडली आहे. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलिसांनी त्वरित या तरुणाला शनिवारी अटक केली आहे.

पोचारम पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ मार्च रोजी ही निदर्यी घटना घडली. आरोपी मनोहर याने तरुणीच्या घरी जाऊन या तरुणीशी जबरदस्ती केली आणि तिच्या शरीरात एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले. घटनेनंतर या तरुणीला ताप आला. त्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. या युवतीवर उपचार सुरु असून तिची स्थिती चिंताजनक आहे.

काय नेमकी घटना?
हा धक्कादायक प्रकार हैदराबादच्या घाटकेसर स्थित पोचारम पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ मार्च रोजी घडला. आरोपी मनोहरला पोलिसांनी शनिवारी १४ मार्च रोजी अटक केली. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात पोलिसांनी मनोहरला अटक केल्याचे दिसत आहे.

आरोपीचे नाव मनोहर असे आहे. मनोहर याचे या तरुणीसोबत प्रेम होते. आणि त्याने तिच्याशी साखरपुडाही केला होता. मात्र, नंतर तरुणीच्या कुटुंबियांना कळले की मनोहर आणि त्याचे आई-वडील एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. नंतर हे लग्न मोडण्याचा निर्णय तरुणीच्या कुटुंबियांनी केला. या नकाराने चिडलेल्या मनोहरने अखेर हे निर्दयी कृत्य केले.

बदला घेण्याच्या इराद्याने
लग्न मोडल्याने मनोहर चिडला होता. बदला घेण्याच्या इराद्याने त्याने हा धक्कादायक प्रकार केला. या प्रकारचा गुन्हा कायद्याने तर मोठा गंभीर आहेच शिवाय मानवतेच्या दृष्टीने देखील हीन दर्जाचा आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे पोलिसांवर दबाव आला. अखेर पोलिसांनी १४ मार्च रोजी आरोपीला मनोहर याला अटक केली. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!