Today सोमवार, 10th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Fire Accident : अग्निकांडाची भीषण घटना! इलेक्ट्रिक कार चार्जिंगवेळी शॉर्ट सर्किट, ४ गॅस सिलिंडरचा स्फोट; ७ जणांचा मृत्यू

Fire Accident : अग्निकांडाची भीषण घटना! इलेक्ट्रिक कार चार्जिंगवेळी शॉर्ट सर्किट, ४ गॅस सिलिंडरचा स्फोट; ७ जणांचा मृत्यू

Fire Accident : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात एका घराबाहेर इलेक्ट्रिक कार चार्ज करत असताना शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा जळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्घटनेत घरातील १५ गॅस सिलिंडरांपैकी ४ सिलिंडरचा एकापाठोपाठ स्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण घर क्षणार्धात जळून खाक झाले.

इंदूरच्या प्रीती नगर परिसरात (बंगाली स्क्वेअरजवळ) असलेल्या एका घरात ही धक्कादायक घटना घडली. घरमालक मनोज पुगलिया यांच्यासह कुटुंबातील ७ सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. घरात १५ गॅस सिलिंडर ठेवलेले होते, जे आगीच्या धगीत सापडले आणि त्यातील ४ सिलिंडरचा स्फोट झाला.

नेमकं काय घडलं?

रात्री उशिरा कुटुंबीय झोपले असताना घराबाहेरील पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक कार चार्जिंगला लावली होती. चार्जिंग दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याने कारला आग लागली. ही आग वेगाने पसरून घरातील गॅस सिलिंडरपर्यंत पोहोचली. एकापाठोपाठ स्फोट होऊन संपूर्ण परिसर हादरला. आग इतक्या वेगाने पसरली की कुणालाही घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

या घटनेत मनोज पुगलिया आणि कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पुगलिया कुटुंबात एक कार्यक्रम होणार होता. त्याची तयारी सुरू असताना काही नातेवाईक मुक्कामी आले होते. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली. पोलीस, अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या ५ पेक्षा अधिक गाड्या वापरून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, पण तोपर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला होता.

या घटनेने संपूर्ण इंदूर शहर हादरले असून, लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसंदर्भात सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून पाहणी करत आहेत. मृत्यूंचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!