Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sujay Vikhe : अशोक खरात प्रकरणात “अजून मोठे मासे बाहेर येणार”, सुजय विखेंच्या दाव्याने खळबळ

Sujay Vikhe : अशोक खरात प्रकरणात “अजून मोठे मासे बाहेर येणार”, सुजय विखेंच्या दाव्याने खळबळ

Sujay Vikhe : भोंदू तांत्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठं राजकीय वादळ निर्माण केलं असून आता या प्रकरणात भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिकच चर्चेत आला आहे.

महिला अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष महिला तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून संबंधित अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, तपासादरम्यान अशोक खरात याच्या संपत्तीबाबत धक्कादायक माहिती समोर येत असल्याचे सांगितले जात आहे.

खरातने विविध राजकीय नेत्यांशी संबंध ठेवत मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमा केल्याचा आरोप होत आहे. नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याच्या मालमत्तेचे मूल्य ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, “मी अशोक खरातला कधीही भेटलेलो नाही किंवा त्याच्याशी कोणताही संपर्क नाही.” मात्र, त्यांनी पुढे सांगितले की, “फक्त शिर्डीच नव्हे, तर राहाता, साकुरी आणि इतर भागांमध्येही त्याने मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती आहे.”

खरातचा मूळ गाव सिन्नर तालुक्यातील मिरगाव असून, त्याने शिर्डी परिसरात मोठी गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. या सर्व मालमत्तेबाबत पोलिस तपास सुरू असून, त्यातून अधिक स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

या प्रकरणात अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. “हे जाळं फक्त एका जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. अजून अनेक मोठे मासे उघड होतील,” असा दावा विखे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे सोपवला असून, येत्या काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!