Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Summer Special Train: विदर्भातील प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-मुंबईतून नागपूरसाठी सुटणार 106 स्पेशल ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Summer Special Train: विदर्भातील प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-मुंबईतून नागपूरसाठी सुटणार 106 स्पेशल ट्रेन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Summer Special Train: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने पुणे आणि मुंबईकरांसाठी मोठा दिलासा दिला आहे. पुणे, मुंबई ते नागपूर आणि अमरावती दरम्यान तब्बल १०६ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विशेष गाड्यांचे पूर्ण वेळापत्रक आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत:

१. मुंबई (CSMT) – नागपूर – मुंबई (एकूण ५२ फेऱ्या)
मुंबईहून नागपूरसाठी द्विसाप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे.

  • गाडी क्र. ०२१४१: १९ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान दर रविवार आणि मंगळवारी मुंबईहून (CSMT) रात्री १२:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:१० वाजता नागपूरला पोहोचेल.
  • गाडी क्र. ०२१४२: १९ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान दर रविवार आणि मंगळवारी नागपूरहून रात्री ८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता मुंबईला पोहोचेल.
  • प्रमुख थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
  • डब्यांची रचना: १ एसी-टू टायर, ६ एसी-थ्री टायर, ९ स्लीपर आणि ४ जनरल डबे.

२. पुणे – नागपूर – हडपसर (साप्ताहिक वातानुकूलित विशेष)
पुणे आणि नागपूर दरम्यान ५४ विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

  • गाडी क्र. ०९४६९: २१ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान दर मंगळवारी पुणे स्थानकावरून संध्याकाळी ५:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३० वाजता नागपूरला पोहोचेल.
  • गाडी क्र. ०९४७०: २२ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान दर बुधवारी नागपूरहून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ७:३० वाजता हडपसरला पोहोचेल.
  • ३. पुणे – नागपूर – हडपसर (बुधवारची विशेष गाडी)
    गाडी क्र. ०९४५७: १५ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान दर बुधवारी पुण्याहून दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ६:३० वाजता नागपूरला पोहोचेल.
  • गाडी क्र. ०१४४८: १६ एप्रिल ते १६ जुलै दरम्यान दर गुरुवारी नागपूरहून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७:३० वाजता हडपसरला पोहोचेल.
  • प्रमुख थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.

उन्हाळ्यातील गर्दी टाळण्यासाठी या विशेष गाड्यांचे आरक्षण आगाऊ करणे फायदेशीर ठरेल. रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांचा प्रवास आता सुसाट आणि सुखकर होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!