Summer Special Train: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने पुणे आणि मुंबईकरांसाठी मोठा दिलासा दिला आहे. पुणे, मुंबई ते नागपूर आणि अमरावती दरम्यान तब्बल १०६ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विशेष गाड्यांचे पूर्ण वेळापत्रक आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत:
१. मुंबई (CSMT) – नागपूर – मुंबई (एकूण ५२ फेऱ्या)
मुंबईहून नागपूरसाठी द्विसाप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे.
- गाडी क्र. ०२१४१: १९ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान दर रविवार आणि मंगळवारी मुंबईहून (CSMT) रात्री १२:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३:१० वाजता नागपूरला पोहोचेल.
- गाडी क्र. ०२१४२: १९ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान दर रविवार आणि मंगळवारी नागपूरहून रात्री ८:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १:३० वाजता मुंबईला पोहोचेल.
- प्रमुख थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
- डब्यांची रचना: १ एसी-टू टायर, ६ एसी-थ्री टायर, ९ स्लीपर आणि ४ जनरल डबे.
२. पुणे – नागपूर – हडपसर (साप्ताहिक वातानुकूलित विशेष)
पुणे आणि नागपूर दरम्यान ५४ विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
- गाडी क्र. ०९४६९: २१ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान दर मंगळवारी पुणे स्थानकावरून संध्याकाळी ५:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३० वाजता नागपूरला पोहोचेल.
- गाडी क्र. ०९४७०: २२ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान दर बुधवारी नागपूरहून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ७:३० वाजता हडपसरला पोहोचेल.
- ३. पुणे – नागपूर – हडपसर (बुधवारची विशेष गाडी)
गाडी क्र. ०९४५७: १५ एप्रिल ते १५ जुलै दरम्यान दर बुधवारी पुण्याहून दुपारी ३:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ६:३० वाजता नागपूरला पोहोचेल. - गाडी क्र. ०१४४८: १६ एप्रिल ते १६ जुलै दरम्यान दर गुरुवारी नागपूरहून सकाळी ८:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ७:३० वाजता हडपसरला पोहोचेल.
- प्रमुख थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
उन्हाळ्यातील गर्दी टाळण्यासाठी या विशेष गाड्यांचे आरक्षण आगाऊ करणे फायदेशीर ठरेल. रेल्वेच्या या निर्णयामुळे विदर्भातील प्रवाशांचा प्रवास आता सुसाट आणि सुखकर होणार आहे.


