Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Petrol Price Hike: पुण्यात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका

Pune Petrol Price Hike: पुण्यात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका

Pune Petrol Price Hike: मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याचा थेट परिणाम पुण्याच्या इंधन दरांवर झाला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत झालेल्या वाढीमुळे पेट्रोलियम कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजेच 20 मार्च 2026 पासून पुणेकरांना प्रीमियम पेट्रोलसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

पुण्यातील नवे इंधन दर
पेट्रोलियम कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘स्पीड’ आणि ‘पॉवर’ यांसारख्या प्रीमियम पेट्रोलच्या दरात बदल झाले आहेत. ‘स्पीड/पॉवर’ प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.09 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या पेट्रोलचा दर 111.68 रुपये प्रति लिटर होता, तो आता 113.77 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे.

जुना दर: 111.68 रुपये प्रति लिटर
वाढ: 2.09 रुपये प्रति लिटर
नवा दर: 113.77 रुपये प्रति लिटर

दरवाढीचे मुख्य कारण
दरवाढीमागे जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मध्यपूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने तेल उत्पादन व पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या संघर्षात ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाल्यामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.

आगामी काळात दरवाढ अटळ?
तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळे निर्माण झाल्यास जागतिक तेल पुरवठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, कारण जगातील सुमारे 20 टक्के तेल वाहतूक या मार्गाने होते. यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधन दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात सर्वसामान्यांच्या खिशावर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!