Today बुधवार, 27th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

WhatsApp पुन्हा आणतंय एक भन्नाट फीचर; आता मेसेज ऑटोमॅटिकच होईल Translate

WhatsApp पुन्हा आणतंय एक भन्नाट फीचर; आता मेसेज ऑटोमॅटिकच होईल Translate

नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकजण व्हॉट्सअॅपचा वापर करत असतील. या व्हॉट्सअॅपच्या वापरामुळे कंपनीकडूनही अनेक फीचर्स आणले जात आहे. त्यातच आता व्हॉट्सॲपवरील चॅटिंग आणखी सोपे होणार आहे, ज्यामुळे युजर्सला इतर भाषा बोलणाऱ्या लोकांशी सहजपणे चॅट करता येईल. वेबेटाइन्फोच्या (Wabetainfo) माहितीनुसार, या एक स्वयंचलित भाषांतर फीचर आणले जात आहे.

ॲपलच्या iOS प्लॅटफॉर्मसाठी एका स्वयंचलित भाषांतर वैशिष्ट्याची चाचणी करत असल्याचे वृत्त देत आहे. या भाषांतर वैशिष्ट्याअंतर्गत, युजर्स २१ भाषांमधून निवड करू शकतील आणि नंतर त्यांचे स्वतःच्या भाषेत भाषांतर करू शकतील. यासाठी फक्त एक टॉगल चालू करणे आवश्यक आहे, ज्याची डिटेल्स एका स्क्रीनशॉटमध्ये देखील शेअर करण्यात आला आहे. हे व्हॉट्सॲप फीचर्स अशा लोकांशी चॅट करण्यासाठी उपयुक्त ठरेल जे तुमची भाषा बोलत नाहीत आणि इतर भाषांमध्ये संवाद साधतात.

भाषांतर असूनही, एंड-टू-एंड एन्क्रिप्शन कायम ठेवले जाईल. व्हॉट्सॲपची बीटा व्हर्जन iOS 26.11.10.70 चाचणीसाठी उपलब्ध आहे. या टेस्टिंग व्हर्जनवरून असे दिसून येते की, व्हॉट्सॲप एका स्वयंचलित भाषांतर वैशिष्ट्यावर काम करत आहे, जे अंदाजे २१ वेगवेगळ्या भाषांना सपोर्ट करू शकेल. यासाठी स्क्रीनशॉट्स देखील शेअर करण्यात आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!