Today गुरूवार, 2nd जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Traffic Update: पुणेकर लक्ष द्या! ईदच्या नमाजसाठी लष्कर परिसरातील वाहतूक विस्कळीत; घराबाहेर पडण्यापूर्वी ‘हे’ बदल वाचा

Pune Traffic Update: पुणेकर लक्ष द्या! ईदच्या नमाजसाठी लष्कर परिसरातील वाहतूक विस्कळीत; घराबाहेर पडण्यापूर्वी ‘हे’ बदल वाचा

Pune Traffic Update: रमजान ईदच्या पवित्र निमित्ताने शनिवारी (२१ मार्च) पुणे कॅन्टोन्मेंट (लष्कर) भागातील प्रसिद्ध इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी शहरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव गोळीबार मैदान आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ६:०० ते ११:३० या वेळेत हे निर्बंध लागू राहतील. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे मार्ग राहतील पूर्णपणे बंद
नमाज पठणाच्या मुख्य काळात काही रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत. यामध्ये मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक या दरम्यानच्या रस्त्याचा समावेश आहे. तसेच, सोलापूर बाजार पोलीस चौकी ते गोळीबार मैदान हा मार्गही वाहतुकीसाठी खुला नसेल. परिणामी, या भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी रस्त्यांची निवड करणे आवश्यक आहे.

जड आणि हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
सोलापूर रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना भैरोबा नाला चौकातून वानवडी आणि लुल्लानगरमार्गे वळवण्यात आले आहे. तसेच, हलक्या वाहनांनी स्वारगेट किंवा शहराच्या मध्यभागात जाण्यासाठी भैरोबा नाला, एम्प्रेस गार्डन आणि घोरपडी या मार्गांचा अवलंब करावा. यामुळे गोळीबार मैदान परिसरातील ताण कमी होण्यास मदत होईल.

स्वारगेट आणि लष्कर भागातील अंतर्गत बदल
स्वारगेटकडून हडपसरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी सात लव्हज (चिमणराव ढोले पाटील) चौकातून गुलटेकडी आणि सॅलिसबरी पार्क मार्गे पुढे जावे. लष्कर भागातील अंतर्गत वाहतुकीतही बदल करण्यात आला असून, सीडीओ चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहने आता खटाव बंगला चौकातून नेपियर रोड किंवा बिशप स्कूलमार्गे वळवण्यात आली आहेत. सणाच्या दिवशी वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी पुणेकरांनी या बदलांची नोंद घेऊनच आपल्या प्रवासाचे नियोजन करावे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!